उन्हाळ्यात ताजेतवाना करतील ही 7 पेयं, पाहा कोणती ?
Created By: Atul Kamble
13 March 2026
कच्च्या कैरींपासून कैरी पन्हं उन्हाळ्यात थंडावा देते. यात व्हिटामिन सी, मिनरल उष्माघातापासून वाचवतात.थंडाव्या सोबत डीहाड्रेशनपासूनही बचाव करते
ताक हलके आणि पचनासाठी चांगले असते. यात प्रोबायोटिक्स असतात जे पोटाला थंडावा देतात. पचन देखील चांगले होते. उन्हाळ्यात रोज एक ग्लास ताक प्यायल्याने ताजे वाटते.
लिंबू पाण्यात व्हिटामिन्स सी असते. शरीराला लिंबू सरबत एनर्जी देते.शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते.
पूर्व भारतात सत्तूचे सरबत प्रसिद्ध आहे. प्रोटीनने परिपूर्ण असलेले सत्तू शरीराला थंड देखील ठेवते.
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स भरपूर असते. हे शरीराला लागलीच हायड्रेट करते, उन्हाळ्यातील कमजोरी आणि थकवा दूर करते.
बेलाचे सरबत शरीराला थंडावा देते. पोटातील उष्णता कमी करते. आणि पचन यंत्रणा चांगली करते
कलिंगडचे ज्यूस शरीरास हाटड्रेट राखते. शरीरास थंड राखण्यासोबत ताजेतवाने करते.