कोणते अन्नपदार्थ रक्तवाढीसाठी  मदत करतात

Created By: Atul Kamble

13 March 2026

शरीरात रक्ताचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. त्यामुळे ऑक्सिजन सर्व अवयवांपर्यंत पोहचतो.त्यामुळे थकवा कमी होऊन संपूर्ण दिवस शरीर एक्टीव्ह राहाते.कोणते अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तवाढते ते पाहूयात

पालक भाजीत आयर्न आणि फॉलिक एसिड असते. त्याने रक्ताची कमतरता दूर होते.शरीराला पुरेशी एनर्जी आणि ताकद मिळते.

बिटाच्या भाजीत आयर्न आणि पॉटेशियम असते.त्याने रक्त वाढीस मदत होते. शरीराचा थकवा दूर होऊन शरीर एक्टीव्ह होते. 

मुळ्याच्या पानात आयर्न आणि व्हिटामिन असते. सलाड किंवा भाजीत मुळ्याचे सेवन केल्याने रक्त वाढते.

 डाळी आणि बिन्समध्ये आयर्न तसेच प्रोटीन जास्त असते. त्यांनी रक्तवाढीस मदत मिळते.

अंजीर आणि मणूक्यात आयर्न आणि नैसर्गिक साखर असते.याच्या सेवनाने रक्त वाढते आणि कमजोरी दूर होते. 

अंडी आणि मांस खाल्ल्याने आयर्न आणि प्रोटीन मिळते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी ताकद मिळण्यासाठी आहारात त्यांचा समावेश करावा.