AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा

India Iran Relation : इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. मात्र भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी भारताला दिलासा देणारे विधान केले आहे.

भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा
india iran RelationImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 13, 2026 | 8:01 PM
Share

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगातील तेल पुरवठ्यावर परिणाम झाल आहे. इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांवरही याचा परिणाम झाला आहे. अशातत आता भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी भारताला दिलासा देणारे विधान केले आहे. भारताच्या जहाजांना हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास परवानगी मिळू शकते असं फतहाली यांनी सांगितलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणकडून भारताला मोठा दिलासा

इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांबाबत आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. जहाजांना या मार्गाने प्रवास न करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच फतहाली यांना विचारण्यात आले की, भारताला होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळेल का, यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘हो, कारण भारत आमचा मित्र आहे. दोन-तीन तासांत असे घडताना दिसेल.’ या जलमार्गावर परिणाम झालेला असताना इराणकडून हे विधान आल्याने आता भारताची सर्वात मोठी डोकेदुखी मिटण्याची शक्यता आहे.

भारत आणि इराणचे हितसंबंध एकसारखे

भारताला होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाता येईल का? असा थेट प्रश्न विचारल्यावर मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, ‘हो, हो, भविष्यात तुम्ही असे पाहू शकता. मला वाटते की दोन-तीन तासांत असे काही घडू शकते.’ फतहाली यांनी भारताला इराणसाठी एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘या भागात इराण आणि भारताचे हितसंबंध एकसारखे आहेत, असे आम्हाला वाटते.’

भारत आम्हाला मदत करतो

भारत-इराण यांच्यातील संबंधांवर बोलताना मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, ‘हे आमचेही दु:ख आहे आणि त्यांचेही. त्यामुळेच भारत सरकार आमची मदत करते आणि आम्हीही भारत सरकारला मदत केली पाहिजे, कारण आमचे परस्पर विश्वास आणि समान हितसंबंध आहेत. या प्रदेशात भारत आणि इराणचे सामायिक हित आहेत.’ अशातच आता इराणमधील सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी भारतातील इराणी दूतावासाला दोन्ही देशांमधील संबंध मजबूत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल