AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्याला विशाखापट्टणममध्ये खास कामगिरीची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलंय. आता सूर्याला चौथ्या सामन्यात खास कामगिरी संधी आहे.

Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्याला विशाखापट्टणममध्ये खास कामगिरीची संधी, फक्त इतक्या धावांची गरज
Suryakumar Yadav Indian Cricket TeamImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 28, 2026 | 3:32 AM
Share

कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत धमाका केला आहे. टीम इंडियाने नागपूर, रायपूरनंतर गुवाहाटीत सामने जिंकून विजयी हॅट्रिक केली आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 जानेवारीला विशाखापट्टणममध्ये होणार आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव याला खास कामगिरी करण्याची संधी आहे.

सूर्याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यापासून टीम इंडिया अजिंक्य आहे. भारताने एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. सूर्याला गेली काही महिने धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र सूर्याला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतून सूर गवसला. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20i सामन्यात अर्धशकक झळकावलं. सूर्याने अशाप्रकारे या 3 सामन्यांच्या मालिकेतील 3 डावांत एकूण 171 धावा केल्या आहेत. आता सूर्या इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. 3 हजार टी 20i धावा पूर्ण करण्याची संधी आहे. सूर्याला त्यासाठी फक्त 41 धावांची गरज आहे.

सूर्या खास कामगिरीसाठी सज्ज

सूर्याने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 102 सामन्यांमध्ये 2 हजार 959 धावा केल्या आहेत. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध विशाखापट्टणमध्ये चौथ्या टी 20i सामन्यात 41 धावा केल्या तर तो भारतासाठी अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरेल. आतापर्यंत भारतासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीच अशी कामगिरी केली आहे. तसेच एकूण 11 फलंदाजांनाच असा कारनामा करता आला आहे.

टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 4 हजार 231 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 4 हजार 188 टी 20i धावा केल्या आहेत. मात्र रोहित आणि विराट टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

सूर्याचं सुपर कमबॅक

दरम्यान सूर्याला न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेआधी टीकेचा सामना करावा लागला. सूर्याला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे सूर्यावर कामगिरीवरुन टीका करण्यात येत होती. मात्र सूर्याला न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेतून सूर गवसला. सूर्याने नागपूरमध्ये 32, रायपूरमध्ये नाबाद 82 आणि गुवाहाटीत 57 धावांची खेळी केली. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव विशाखापट्टणममध्ये अर्धशतकाची हॅट्रिक पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...