Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी ‘त्या’ फोटोबाबत अखेर सांगितलंच
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं कामकाज सुरु आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या मेळ्याचे कामकाज प्रमुख्याने मंत्री गिरीश महाजनांच्या हाताखाली होत आहे. अशात बनावट टेंडर प्रकरणी घोटाळा झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन आरोपींना आटक करण्यात आली. जे गिरीश महाजनांचे लांबचे नातलग आहेत.
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं कामकाज सुरु आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या मेळ्याचे कामकाज प्रमुख्याने मंत्री गिरीश महाजनांच्या हाताखाली होत आहे. अशात बनावट टेंडर प्रकरणी घोटाळा झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन आरोपींना आटक करण्यात आली. जे गिरीश महाजनांचे लांबचे नातलग आहेत.
बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींसोबत स्वतःचे फोटो समोर आल्यानंतर महाजन यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “आरोपींचे माझ्यासोबतचे फोटो असले म्हणजे मी गुन्हेगार होत नाही.” महाजन यांनी कबूल केले की, या प्रकरणातील एका आरोपीशी त्यांचे दूरचे नातेसंबंध आहेत आणि तो सराईत असल्याचे गावाला माहीत आहे. ते म्हणाले, “माझा तो दूरचा नातेवाईक आहे हे खरे आहे. एखादा-दुसरा फोटो असेल, हे खरे आहे म्हणजे वर्षानुवर्षे भेट नसते.” एखाद्या घरगुती कार्यक्रमात किंवा अन्य प्रसंगी काढलेला फोटो असेल, तरी त्याचा अर्थ फोटो काढणारी व्यक्ती गुन्हेगार ठरते असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक सार्वजनिक जीवनातील व्यक्ती, मंत्री यांच्या बाबतीतही असे घडले आहे, असे उदाहरण त्यांनी दिले. त्यांचे सख्खे लोकही जेलमध्ये गेले आहेत. मंत्री झाल्यानंतर अनेक लोक त्यांच्या घरामध्ये लोकांना भेटतात आणि फोटो काढतात. नंतर त्यापैकी काही लोक गुन्हेगार असल्याचे समोर येते. त्यामुळे केवळ फोटोमुळे कुणाला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही, असे गिरीश महाजनांनी नमूद केले.
Published on: Aug 15, 2026 03:45 PM
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...

