संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? ‘त्या’ व्हिडीओचं सत्य काय?
काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणावेळी वंदे मातरम् पूर्ण वाजवल्याने सोनिया गांधी नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंकडे नाराजी व्यक्त केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काँग्रेस मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान, वंदे मातरम् गीत पूर्ण वाजवल्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रसंगाची दृश्ये समोर आली असून, सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली असा अंदाज वर्तवला जात आहे.
यावेळी आता काँग्रेस पक्षाने या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी वंदे मातरम्चा पूर्ण आदर राखला आहे आणि त्यांच्या नाराजीच्या चर्चा निराधार आहेत. ध्वजारोहण सोहळ्याला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी उपस्थित होते. व्हिडीओमध्ये सोनिया गांधी खरगेंशी बोलताना दिसत असल्या तरी, काँग्रेसने याला नाराजी मानण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मात्र विविध चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Aug 15, 2026 02:35 PM
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल

