AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाची विशाखापट्टणममधील कामगिरी कशी? किती सामने जिंकलेत?

India vs New Zealand 4th T20i : टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. तर चौथा सामना हा विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

IND vs NZ : टीम इंडियाची विशाखापट्टणममधील कामगिरी कशी? किती सामने जिंकलेत?
Surya Bumrah Sanju Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 28, 2026 | 4:20 AM
Share

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला गुवाहाटीत पराभूत करुन मालिका आपल्या नावावर केली आहे. आता उभयसंघातील चौथा टी 20I सामना हा विशाखापट्टणममध्ये होणार आहे. हा सामना बुधवारी 28 जानेवारीला होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाने या मैदानात किती टी 20I सामने खेळले आहेत? तसेच त्यापैकी किती सामन्यांमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आतापर्यंत न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये भारताचा दबदबा राहिला असल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या तिघांना रोखण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरलेत.

इशान किशन याने न्यूझीलंड विरूद्धच्या कामगिरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीही कडक बॉलिंग करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखलं. आता टीम इंडियाची विशाखापट्टणममधील टी 20I क्रिकेटमधील आकडेवारी पाहता न्यूझीलंडचा सलग चौथा पराभव निश्चित आहे, असं चाहते म्हणत आहेत.

भारताची विशाखापट्टणममधील आकडेवारी

टीम इंडियाने टी 20I क्रिकेटच्या इतिहासात विशाखापट्टणममध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने या मैदानात एकूण 4 टी 20I सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात भारताला पराभूत व्हावं लागलंय. टीम इंडियाची सध्याची कामगिरी पाहता न्यूझीलंडसाठी इथे या मैदानात विजय मिळवणं फार अवघड आहे.

विशाखापट्टणममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर

विशाखापट्टणमधील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी आतापर्यंत फायदेशीर ठरली आहे. खेळपट्टीतून उसळी प्राप्त होते. त्यामुळे बॉल सहज बॅटवर येण्यास मदत होते. त्यामुळे ट्रॅक रेकॉर्ड पाहता, या मैदानात क्रिकेट चाहत्यांना हायस्कोअरिंग सामन्याचा थरार अनुभवयाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संजू सॅमसनला नो एन्ट्री

दरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला त्याच्या निराशाजनक कामगिरीमळे चौथ्या टी 20I सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात बॅटिंगने निराशा केली. त्यामुळे टीम मॅनेजमेंट संजूवर विश्वास दाखवत पुन्हा संधी देणार की बाहेरचा रस्ता दाखवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणरा आहे.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?