भाजपाचा थेट एकनाथ शिंदे यांना धक्का, राजकारणात मोठी खळबळ, शिवसेनेच्या नेत्याला..
राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या आहेत. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीत ठरला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.

श्रीराम क्षीरसागर: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आहेत. महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. सध्या राज्यात आचारसहिंता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईसह अनेक महापालिकांवर शिवसेना शिंदे गटाने आणि भाजपाने सत्ता मिळवली. महापाैर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. आता महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळतंय. महापालिका निवडणुकीच्या अगोदर महापाैर सोडत काढण्यात आली नव्हती. लवकरच राजकीय पक्ष सत्ता स्थापन करतील. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली महापालिकेत नक्की महापाैर कोणाचा होणार हे स्पष्ट झाले नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात महापाैर पदासह स्थायी समितीवर चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यानच शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची बंडखोरी कायम आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात धनंजय सावंतांचा गट भाजपा सोबत लढणार आहे. हा मोठा धक्का भाजपाने थेट एकनाथ शिंदे यांना दिल्याचे बोलले जात आहे. धनंजय सावंत गटाला जिल्हा परिषदेच्या 2 तर 4 पंचायत समितीच्या जागा सोडण्यात आल्या. स्वतः धनंजय सावंत निजाम जवळा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहे.
भाजप शिवसेना एकत्र असताना तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात शिवसेना भाजप वेगळे लढणार आहेत. आमदार तानाजी सावंत हे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना त्यांच्याविरोधात मोठा डाव केल्याची चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत हे पुतण्याला आपल्या बाजूने घेतील, असे शेवटपर्यंत सांगितले जात होते. मात्र, तानाजी सावंत यांना यश मिळाले नसलयाचे बघायला मिळत आहे.
माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ मिळाली आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरे गटाने घेतले उमेदवारी अर्ज मागे. पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1 आणि पंचायत समीती गणातील 2 अश्या पक्षाच्या 3 जणांचे अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतले.
कमळामुळे आपली राजकीय गणितं जुळली : पृथ्वीराज सावंत यांनी कबुली दिली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटात वेगळं राजकीय समीकरण समोर आले. तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यात कौटुंबिक वितुष्ट आहे. पुतण्याच्या भाजप प्रवेश न होण्यासाठी तानाजी सावंत यांनी लावली होती मुख्यमंत्र्याकडे राजकीय फिल्डिंग. चुलत्याला मागे टाकत भाजपच्या उमेदवारीसाठी पुतण्या ठरला सरस.
