IND vs NZ : भारत-न्यूझीलंड चौथ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
India vs New Zealand 4th T20I Live Streaming : मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला अद्याप एकही टी 20i सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड बुधवारी भारताला सलग चौथा विजय मिळवण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या टी 20i मालिकेचा थरार सुरु आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधीची शेवटची मालिका आहे. टीम इंडियाने रविवारी 25 जानेवारीला गुवाहाटीत न्यूझीलंडवर मात करत सलग तिसरा सामना जिंकला. भारताने यासह ही मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. तर न्यूझीलंड टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरलीय. त्यामुळे न्यूझीलंडसमोर चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. तर टीम इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. हा चौथा सामना कधी आणि कुठे पाहता येईल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना बुधवारी 28 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या टी 20i सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाचा विजयरथ रोखणार?
अवघ्या काही दिवसांवर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्याआधी न्यूझीलंडची टीम इंडिया विरूद्धच्या 5 सामन्यांच्या या टी 20i मालिकेत निराशाजनक कामगिरी राहिलीय. न्यूझीलंड या मालिकेत 0-3 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर उर्वरित सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान आहे. मात्र टीम इंडियासमोर न्यूझीलंड कितपत यशस्वी होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
