AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Walawalkar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल अंकिताचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये…’

Ankita Walawalkar: नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, तिने भाषेबद्दल देखील स्वतःचं मत माडलं आहे... सध्या सर्वत्र अंकिता वालावलकर हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Ankita Walawalkar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल अंकिताचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये...'
| Updated on: Mar 16, 2026 | 10:02 AM
Share

Ankita Walawalkar: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण कन्या हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात देखील अंकिता हिने दमदार खेळी खेळत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अंकिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, अंकिता सामाजिक विषयांवर देखील स्वतःचं मत मांडत असते. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता हिला महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण आहे? असा प्रश्न विचारणात आला.

यावर अंकिता हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. अंकिता म्हणाली, ‘नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शन या तीन बाबींचा विचार केला तर मला असं वाटतं की, बिग बॉस हे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील…’

पुढे अंकिता हिला ‘तुझ्या बोली भाषेका कुठे पाहतेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला, यावर अंकिता म्हणाली, ‘महाराष्ट्रात खूप बोलीभाषा आहेत. बिग बॉसमध्ये आता आपण वेगळी भाषा पाहिली… जी माझ्यासाठी देखील नवीन होती… तशीच मालवणी भाषा देखील आहे… त्यामुळे माझी भाषा मी कुठे पाहते असं म्हणता येणार नाही… आपल्याकडे विविधता आहे, भाषांमध्येसुद्धा आणि प्रत्येक भाषा जपत मराठी भाषा देखील जपली पाहिजे…’

मराठी सिनेमात किंवा नाटकात काम करायला आवडेव का? असा प्रश्न देखील अंकिता हिला विचारण्यात आला, यावर अंकिता म्हणाली, ‘मला नाटकात काम करायला आवडेल.. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतात… पण यातलं काही नाही जमलं तर निर्मिती नक्की करेल…’, असं देखील अंकिता म्हणाली.

अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंकिता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर अंकिता हिचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर अंकिता फक्त 2 हजार 38 नेटकऱ्यांना फॉलो करते.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ