AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ

एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री हे गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास धडपडत असल्याचे वृत्त आल्याने राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
sharad pawar and devendra fadnavis
| Updated on: Jun 23, 2026 | 11:08 PM
Share

एकीकडे राज्यातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाने आपल्या किंवा सहकारी पक्षात समावेश करण्याचा सपाटा लावला असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बडे नेते गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रतिक्षेत असल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामाच्या निमित्ताने राजेंद्र शिंगणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जरी बोलले जात असले तरी जिल्हा भर त्यांच्या भाजपातील प्रवेशांची चर्चा केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे भेटीसाठी प्रतीक्षेत असल्याने जिल्हाभर त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली आहे. मात्र, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामाच्या निमित्ताने शिंगणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची माहिती त्यांच्या जवळचा लोकांनी दिली आहे. तर डॉ शिंगणे यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार असल्याचे म्हटले आहे.

मी जिथे आहे तिथेच ठीक आहे

भाजप प्रवेशा संदर्भात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना फोनवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मी जिथे आहे तिथेच ठीक आहे. त्यामुळे मी कुठेही भाजपमध्ये जाणार नाही. अशा प्रकारची भूमिका त्यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना स्पष्ट केली.ही वायफळ चर्चा कुणी सुरू केली मला माहिती नाही. मी एकनिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांना मी भेटण्यासाठी आलो ते जिल्हा बँकेच्या कामासाठी आलो आहे. बुलढाणा जिल्हा बँकेत ज्या जिल्ह्यातील शासकीय संस्था आहेत. त्या संस्थांचे व्यवहार बँकेमध्ये पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी आपण पत्र घेऊन आलो होतो.

पुढील आठवड्यात पुन्हा मुंबईला येणार

या संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर शासकीय कार्यालये व्यवहार पुन्हा एकदा जिल्हा बँकेत सुरू करावीत, तसेच खत कारखान्याच्या परवाना नूतनीकरण संदर्भात फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे आलो होतो. मात्र त्यांची वेळ न मिळाल्यामुळे भेट होऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन-तीन दिवसापासून मी त्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहे. पुन्हा एकदा पुढील आठवड्यात हेच पत्र घेऊन मी त्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहे असेही त्यांनी टीव्ही नाईन मराठी बोलताना सांगितले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?