विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही…
विधीमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या प्रसाधनगृहाबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री आणि आमदारांव्यतिरिक्त इतर कोणालाही या प्रसाधनगृहात प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पूर्णवेळ एका शिपायाची नियुक्ती करण्यात आली असून तो दिवसभर त्या ठिकाणी ठाण मांडून बसत असल्याचे दिसून आले आहे.

विधीमंडळ परिसरात अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मात्र संबंधित प्रसाधनगृहाचा वापर फक्त मंत्री आणि आमदारांनीच करावा, अशा सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अधिकारी किंवा इतर व्यक्तींना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काहींनी ही व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी सामान्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याची टीका केली आहे. विधीमंडळ परिसरातील या व्यवस्थेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
Published on: Jun 23, 2026 04:45 PM
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची