AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट

केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीला अटक झाली असून, आता चेतनच्या वकिलाने एफआयआरमध्ये त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा मोठा दावा केला आहे. यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
Ketan Agarwal MurderImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 11:13 PM
Share

केतन अग्रवाल प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे दोघे मुख्य आरोपी असल्याची चर्चा होती. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपी नंबर दोन असलेल्या चेतन चौधरीच्या वकिलाने मोठा दावा केला आहे. चेतन विरोधात एफआयआरमध्ये कोणतेच पुरावे नाहीत, असा दावा वकिलाने केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

आरोपी चेतन चौधरीचे वकील राम शहाणे यांनी हा दावा केला आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने दोनही आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. पोलिसांनी दिलेल्या रिमांडच्या कारणावरून न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी क्रमांक दोन चेतन चौधरी याच्यावर एफआयआरमध्ये कुठलेच आरोप नाहीत. चेतनला फक्त मुलीचा मित्र म्हणून या गुन्ह्यात घेतलं आहे. आरोपी चेतन चौधरी हा लोहगड परिसरात फिरत असल्याचा कुठलाही सबळ पुरावा नाही. तसेच कोर्टात या संदर्भात कुठली कागदपत्र दाखल करण्यात आलेली नाही, असा दावाच वकील राम शहाणे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं मानलं जात आहे.

आरोपींना कोठडी

दरम्यान, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी ला वडगाव न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चर्चा काय होती?

दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक चर्चा सुरू होत्या. सियालने केतनला दरीत ढकलून दिले, अशी चर्चा सुरू होती. तिच्या सोबत तिचा प्रियकर चेतन चौधरीही होता. तो लोहगडावरच काही अंतरावर होता. या दोघांनी मिळूनच हा कट रचला होता, अशी चर्चा होती. मात्र, आता चेतनच्या वकिलाने केलेल्या दाव्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!