AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

| Updated on: Jun 23, 2026 | 4:56 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 6 नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडत आहे. विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नव्या आमदारांनी शपथ घेतल्यानंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

अहिल्यानगर मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले प्राजक्त तनपुरे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील अरुण लखानी, ठाणे मतदारसंघातील रवींद्र फाटक, गडचिरोलीतील दुष्यन्त चतुर्वेदी, पुण्यातील विक्रम काकडे आणि रायगडमधील अनिकेत तटकरे यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्यासाठी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि कुटुंबीय उपस्थित होते. विधान भवन परिसरात सकाळपासूनच राजकीय हालचाली वाढलेल्या पाहायला मिळाल्या. नव्या सदस्यांकडून विधान परिषदेत आपल्या मतदारसंघाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, आगामी अधिवेशनात हे सर्व आमदार कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 23, 2026 04:56 PM

Follow Us