AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ

Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ

| Updated on: Jun 23, 2026 | 4:16 PM
Share

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध भत्ते आणि वेतनवाढीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत यासंदर्भात मोठी घोषणा केली.

सरकारच्या निर्णयानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून तो ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय, घरभाडे भत्त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अनुक्रमे ८, १६ आणि २४ टक्के असलेला घरभाडे भत्ता आता १०, २० आणि ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच वार्षिक वेतनवाढीच्या दरातही सुधारणा करण्यात आली असून, तो २ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published on: Jun 23, 2026 04:16 PM

Follow Us