AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Shortage: घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी ॲक्शन,3 दिवसात 10 सर्वात मोठे निर्णय

LPG Shortage Modi Government Decision: गॅसच्या अभूतपूर्व टंचाईने राष्ट्र आणि राज्य होरपळले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळ चालकांना मोठा फटका बसला. तर कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच सर्वसामान्यांची दोन वेळच्या जेवणासाठीची कसरत लांबच लांब रांगामधून दिसली. त्यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने त्यासाठी दहा दमदार निर्णय घेतले आहे.

LPG Shortage: घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी ॲक्शन,3 दिवसात 10 सर्वात मोठे निर्णय
एलपीजी सिलेंडरImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2026 | 9:01 AM
Share

LPG Shortage Modi Government Decision: मध्य-पूर्वेतील युद्धाची धग आणि झळ संपूर्ण भारताला बसली. गेल्या दोन दिवसांपासून एका गॅस सिलेंडरसाठी जे काही महाभारत सुरू आहे, ते उभा देश पाहत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, चहा, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक, खानावळ चालक हे तर मेटाकुटीला आले आहे. गॅसच उपलब्ध नसल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर सर्वसामान्यांच्या रोजच्या कटकटीत अजून एकीची वाढ झाली. त्यांना काम सोडून सिलेंडर बुकिंगसाठी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहेत. तहानभूक विसरून कुटुंबासाठी अनेकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. तर या धामधुमीत काळाबाजार आणि हेराफेरी करणाऱ्यांनी हात धुवून घेतले आहे. पण मोदी सरकारने या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी जालीम उपाय केले आहेत.

भारतात का वाढले LPG संकट?

भारत हा ऊर्जा स्त्रोसाठी परदेशातील स्त्रोतावर अवलंबून आहे. भारत 25-27 लाख बॅरल तेल प्रतिदिवस सौदी अरब, इराक, कतार आणि UAE कडून खरेदी करतो.भारताचा 55% LPG आणि 30% LNG पण याच देशातून येतो. इराण-इस्त्रायल युद्धामुळे होर्मूज समुद्रधुनीतून जहाजांचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे LPG आणि इंधन पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर बाजारात गॅसचा तुटवडा झाला आहे.

सरकारचे धडाडीचे 10 निर्णय

1. देशभरातली रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले. खासगी आणि सरकारी तेल उत्पादक कंपन्यांना घरगुती LPG उत्पादन वाढवण्यास सांगितले. उत्पादन क्षमता वाढवण्यात आली. लवकरच पुरवठा सुरळीत होईल.

2. साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी बुकिंगमध्ये अंतर वाढवले. गॅस बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केले. त्यामुळे एकाच व्यक्तीला अधिक वेळा गॅस बुकिंग करता येणार नाही. गरजूंना गॅस मिळेल.

3. घरगुती LPG, PNG आणि वाहनांसाठीच्या CNG ला सरकारने प्राथमिकता दिली. रुग्णालये, शाळा, आश्रम, वसतिगृह आणि सर्वसामान्यांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य दिले.

4. व्यावसायिक गॅस पुरवठा पण लवकरच सुरळीत होणार आहे. सध्याच्या पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. तोडगा काढण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत केली.

5. अतिरिक्त उत्पादन झालेले LPG केवळ IOCL, BPCL आणि HPCL कंपन्यांना देण्याचा आदेश दिला. त्यामुळे सर्वसामान्यांना अगोदर गॅस सिलेंडर पुरवठा होईल.

6. देशभरात काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी ESMA लागू केला. धाडसत्र सुरू केले. संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले.

7. आखातातील पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर पर्यायी मार्ग शोधले. नवीन देशाशी गॅस पुरवठ्याबाबत झटपट करार केले. लवकरच गॅसच्या नवीन खेपा भारतात येतील.

8. रशियाकडून खरेदी वाढवली. या मार्च महिन्यातील सुरुवातीच्या या 11 दिवसात रशियाकडून इंधन खरेदी 50% वाढवली. आयात वाढवून 15 लाख बॅरल प्रति दिवसावर पोहचले. IOC आणि रिलायन्सने 3 कोटी बॅरलसाठी करार केला.

9. LNG साठी अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार केला. GAIL ने LNG साठी अमेरिकेसोबत सौदा केला.

10. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील देशाशी इंधन खरेदीसाठी नवीन करार केला. गुयानासोबत पहिल्यांदाच करार करत 40 लाख बॅरल इंधन खरेदी केली. याशिवाय नायजेरिया आणि अंगोला देशाकडून इंधन मागवण्यात आले आहे. ते लवकरच देशात पोहचेल.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार