AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा मोठा गेम… अमेरिकेच्या त्या अध्यादेशातील धक्कादायक गोष्ट पुढे, भारताला थेट..

भारत आणि अमेरिकेतील संबंध टॅरिफच्या मुद्यात तणावात होते. आता अमेरिकेने मोठी घोषणा करून भारतावर लावण्यात आलेला टॅरिफ मागे घेत असल्याचे म्हटले. मात्र, भारतासोबत पुन्हा मोठा गेम करताना अमेरिका दिसत आहे.

भारताचा मोठा गेम... अमेरिकेच्या त्या अध्यादेशातील धक्कादायक गोष्ट पुढे, भारताला थेट..
donald trump
| Updated on: Feb 08, 2026 | 7:16 AM
Share

टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेतील संबंध प्रचंड तणावात राहिले. जगातील उच्च टॅरिफपैकी असलेला टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही हा टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, ही अमेरिकेची इच्छा होती. रशिया आणि युक्रेन युद्धाला पैसा पुरत असल्याचाही आरोप अमेरिकेने केला. मुळात म्हणजे भारतापेक्षा कितीतरी जास्त पट चीन रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो, पण चीनला दंडात्मक टॅरिफ लावण्यात आला नाही. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा जगातील देश चीन आहे. आता कुठेतरी अमेरिकेने एक पाऊस मागे घेऊन भारतावरील मुळ 25 टक्के टॅरिफपैकी 7 टक्के मागे घेतला. यासोबतच दंडात्मक 25 टक्के टॅरिफ मागे घेण्याबाबत आदेश निघाला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यावर सही देखील केली.

आता भारतावर फक्त 18 टक्के टॅरिफ राहणार आहे. मात्र, यादरम्यानच पुन्हा एकदा अमेरिकेतून भारताला मोठी धमकी देण्यात आली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केलेल्या अध्यादेशात स्पष्टपणे म्हटले की, भारत रशियाकडून पेट्रोलियम उत्पादने खरेदी करत असल्याने लावण्यात आलेला 25 टक्के टॅरिफ रद्द केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आदेशावर सही जरी केली असली तरीही त्यामध्येही मोठा गेम आहे.

यासोबतच, जर भारताने पुन्हा रशियाकडून थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे पेट्रोलियम उत्पादने खरेदी केली तर राष्ट्रपतींना पुन्हा शुल्क लावण्याचा अधिकार असेल असेही त्या अध्यादेशात स्पष्टपणे म्हणण्यात आले. हा मोठा गेम केल्याचे दिसत आहे. भारतावरील दंडात्मक 25 टक्के टॅरिफ अमेरिकेने काढला तरीही भारतावर पुन्हा कारवाईचे मोठे संकेत आहेत.

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत नसल्याचा दावा सातत्याने अमेरिकेकडूनच केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष पुतिन हे भारत दाैऱ्यावर होते, यावेळी त्यांनी काही महत्वाचे करार केले. भारत आणि रशियाचे अनेक वर्षांचे चांगले संबंध आहेत. पण टॅरिफच्या मुद्द्यात दोन्ही देशातील संबंध ताणल्याचे बघायला मिळाले. मार्च महिन्यात भारत आणि अमेरिका व्यापार करार पूर्ण होतील .

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात