AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जग भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश.., भारतावरही मोठं संकट

मोठी बातमी समोर येत आहे, जग पुन्हा एकदा भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला असून, अमेरिकेमध्ये घडामोडींना वेग आला आहे, सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेकडे लागलं आहे.

मोठी बातमी! जग भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश.., भारतावरही मोठं संकट
donald trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 9:08 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संबंध आता प्रचंड ताणले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, अमेरिकन दूतावासाकडून इराणमध्ये असलेल्या आपल्या सर्व नागरिकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी करण्यात आली आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये इराण सोडावं, असा थेट आदेशच अमेरिकेन आता आपल्या इराणमधील नागरिकांना दिला आहे, त्यामुळे अमेरिका आता कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच इराणकडून देखील अमेरिकेला इशारा देण्यात आला होता, की आमच्या क्षेत्रात कुठेही हल्ला झाला तर आम्ही त्याला आमच्याविरोधातील युद्धाला सुरुवात समजू आणि आम्ही देखील मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्व सैन्य तळांवर हल्ले करू, त्यामुळे आता जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर जगात आणखी एका मोठ्या युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणचं सैन्यदल देखील अलर्ट मोडवर असून, अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अनेक महत्त्वाचे रस्ते देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.

युद्धाला सुरुवात होऊ शकते, असं वाटत असल्यानेच आता अमेरिकेनं इराणमधील आपल्या सर्व नागरिकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. तुम्हाला जसं शक्य आहे, तसं हवाई मार्गाने, जलमार्गाने कोणत्याही मार्गाने इराणच्या बाहेर पडा, असं या अ‍ॅडवायझरीमध्ये अमेरिकेनं म्हटलं आहे.तर दुसरीकडे जगातील अनेक देशांनी देखील इराणमध्ये जाणारी विमान उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅडवायझरीमध्ये अमेरिकेनं असं देखील म्हटलं आहे की, इराणमध्ये जे अमेरिकेचे नागरिक आहेत, त्यांनी सरकारच्या मदतीची अपेक्षा न ठेवता, इराणमधून बाहेर पडावं.

भारतालाही बसणार मोठा फटका

दरम्यान अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झालं तर त्याचा फटका हा भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसू शकतो. कारण भारत अजूनही ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण होईल, त्याचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार असून, भारतामध्ये ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं, भारत इराणकडून देखील कच्च्या तेलाची आयात करतो.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी