AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NPS Scheme : दरमहा मिळणार 50000 पेन्शन, सरकारच्या या योजनेमुळे व्हाल मालामाल; किती गुंतवावे लागणार?

या योजनेतील गुंतवणूक इक्विटी आणि डेटसारख्या विविध साधनांमध्ये केली जाते. त्यामुळे मिळणारा परतावा भांडवली बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असून 9 ते 12 टक्के परतावा मिळू शकतो.

NPS Scheme : दरमहा मिळणार 50000 पेन्शन, सरकारच्या या योजनेमुळे व्हाल मालामाल; किती गुंतवावे लागणार?
nps schemeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 7:58 PM
Share

NPS Saving Scheme : आयुष्याच्या उत्तरार्धात जगणं सोपं व्हावं यासाठी जवळ काही पैसे असणे गरजेचे असते. हेच पैसे जवळ असावेत यासाठी अनकेजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळावी यासाठी काही लोक वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करतात. दरम्यान, सध्या सरकारच्या एका योजनेची खूप चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50000 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. म्हणूनच ही योजना नेमकी काय आहे? तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन कसे मिळू शकते, ते जाणून घेऊ या…

निवृत्तीच्या काळात मोठा निधी तयार होऊ शकतो

सरकारच्या या योजनेचे नाव National Pension System (NPS) असे आहे. ही दीर्घकालीन आणि ऐच्छिक निवृत्तीविषयक योजना असून, यात गुंतवणूक केल्यास निवृत्तीच्या काळात मोठा निधी तयार होऊ शकतो. NPS या योजनेवर Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) अंतर्गत देखरेख केली जाते. या योजनेतील गुंतवणूक इक्विटी आणि डेटसारख्या विविध साधनांमध्ये केली जाते. त्यामुळे मिळणारा परतावा भांडवली बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असून 9 ते 12 टक्के परतावा मिळू शकतो.

50 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

समजा एखाद्या व्यक्तीचे वय 25 वर्षे आहे आणि ती व्यक्ती वयाच्या 60 वर्षांपर्यंत NPS मध्ये गुंतवणूक करते असेल, म्हणजेच गुंतवणुकीचा कालावधी 35 वर्षांचा असेल. या अंदाजानुसार दरमहा सुमारे 14 ते 15 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मोठा निवृत्ती निधी तयार होऊ शकतो. 10 टक्के सरासरी वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, निवृत्तीच्या वेळी सुमारे 5 कोटी रुपयांचा कॉर्पस तयार होईल. त्यातील 60 टक्के म्हणजेच जवळपास 3 कोटी रुपये एकरकमी काढता येऊ शकतात. उर्वरित 40 टक्के रक्कम म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये एन्युटीसाठी वापरली जाऊ शकते. एन्युटीवर 6 टक्के परतावा गृहीत धरल्यास, या उदाहरणात दरमहा सुमारे 50 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.

आर्थिक बाबी समजून घेणे आवश्यक

मात्र ही रक्कम अंदाजावर आधारित आहे. प्रत्यक्ष परतावा, एन्युटीचे दर आणि अंतिम पेन्शनची रक्कम बदलू शकते. त्यामुळे NPS मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे नियम आणि आर्थिक बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा