AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्वीस्ट! रणजितसिंह मोहितेंंनंतर धैर्यशील मोहिते पाटीलही OUT

खासदार धैर्यशील मोहितेंनी आता दोन्ही गटातील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातून आता अर्जुनसिंह मोहिते पाटील डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मोहिते पाटील यांच्या घरातील दिग्गज नेत्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. 

Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्वीस्ट! रणजितसिंह मोहितेंंनंतर धैर्यशील मोहिते पाटीलही OUT
| Updated on: Nov 16, 2026 | 9:46 PM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी: Solapur DCC Bank Election 2026:  सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहा माजी संचालकांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला, त्यानंतर या उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही माजी संचालकांचे अपील फेटाळून लावले आहे. अशातच आता शरद पवार गटाचे नेते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं समोर आले आहे.

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्वीस्ट! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माघार घेतली आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज आधीच बाद झाला होता, तसेच बाद ठरवलेल्या उमेदवारी अर्जाचे अपीलही उच्च न्यायालयाने फेटाळले. अशातच आता खासदार मोहिते पाटलांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.  मात्र धैर्यशील मोहिते पाटलांचे बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहे.

जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.  खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कृषी पणन प्रक्रिया संस्था आणि इतर शेती संस्था या दोन्ही गटातून अर्ज दाखल केले होते. मात्र खासदार धैर्यशील मोहितेंनी आता दोन्ही गटातील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातून आता अर्जुनसिंह मोहिते पाटील डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मोहिते पाटील यांच्या घरातील दिग्गज नेत्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांचीही माघार, निवडणुकीत रंगत वाढली! 

दरम्यान, सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांना मोठा धक्का बसला होता. निवडणुकीच्या अर्ज छाननीमध्ये माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह  दिलीप माने, जयंतराव जगताप, संजयमामा शिंदे, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे अशा मातब्बर नेत्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. अर्ज बाद झालेल्या या सर्व नेत्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही सहा माजी संचालकांचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!