AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांचा वारसा चालवते, 50 ब्लॅक कोब्रा वाचवले, 9 महिन्यांत शेकडो सापाचं रेस्क्यू; कोण आहे सर्पमित्र शाझिया?

वडील आजारी पडल्याने ऐनवेळी तिच्यावर वडिलांचे काम करण्याची वेळ आली. पण ती आवडीने हे काम करते. तिने यावेळी सर्वांना मेसेजही दिला आहे, जीव वाचवण्यासाठी काय केले पाहिजे हेही शाझिया सांगते.

वडिलांचा वारसा चालवते, 50 ब्लॅक कोब्रा वाचवले, 9 महिन्यांत शेकडो सापाचं रेस्क्यू; कोण आहे सर्पमित्र शाझिया?
shazia snake rescuerImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 7:09 PM
Share

सापाचं नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. समोर साप दिसला की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. मात्र, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय शाजिया परवीनची गोष्टच वेगळी आहे. अवघ्या 9 महिन्यांत तिने 100 हून अधिक विषारी सापांचं रेस्क्यू केलं आहे. यामध्ये 2 महाकाय अजगर आणि 50 हून अधिक ब्लॅक कोब्रांचाही समावेश आहे. वडिलांकडून मिळालेला वारसा आणि 8 वर्षांचं प्रशिक्षण यामुळे शाझिया आज सर्पमित्र म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिला आता अनेकजण ओळखायला लागले आहेत.

वडिलांकडूनच मिळाला वारसा

शाझियाचे वडील अनीस अहमद गेल्या 40 वर्षांपासून साप पकडण्याचं काम करतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हे काम मुलीकडे सोपवलं. शाजिया कोणत्याही वेळी फोन आला तरी सापांचं रेस्क्यू करण्यासाठी पोहोचते. तिच्या मते, साप किंवा अन्य कोणत्याही मुक्या जीवाला मारण्याऐवजी त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं पाहिजे. साप चावल्यास कोणतेही कर्मकांड आणि जादूटोणा करण्याऐवजी तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असं आवाहनही ती करताना दिसते.

कुटुंबात कोण कोण?

शाझियासाठी, मुक्या जीवांचे प्राण वाचवणे हा व्यवसाय नसून, एक निस्वार्थ आवड आणि छंद आहे. यासाठी तिचा सन्मानही झाला आहे. शाझियाच्या कुटुंबात आठ सदस्य असून, ते सर्व साप पकडण्यात पारंगत आहेत. साप पकडताना तिला अनेक वेळा सापाने दंश केला आहे, पण सुदैवाने ते विषारी नव्हते, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना टळली. एका महिन्यापूर्वी, रात्रीच्या अंधारात मंडी कमिटीमधून एका अजगराची यशस्वी सुटका करणे, हा तिच्या सर्वात धाडसी पराक्रमांपैकी एक होता.

लोकांना दिला मेसेज

सापांना वाचवण्यासोबतच, शाझियाने समाजाला एक प्रभावी संदेशही दिला आहे. ती म्हणते की साप किंवा इतर कोणत्याही मुक्या प्राण्यांना मारू नये. त्याऐवजी, त्यांना वाचवून त्यांच्या सुरक्षित, नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. इतकेच नाही तर, साप चावलेल्यांनी जादूटोणा करण्यात वेळ वाया घालवू नये, असे आवाहन प्रामुख्याने शाझियाने केले आहे. ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार घ्या, असं ती म्हणते.

Follow Us
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?