AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2027 Retention: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मोठी नावं बाहेर! ट्रेंट बोल्टसह ‘हे’ दिग्गज 3 खेळाडू MI मधून रिलीज, पाहा संपूर्ण यादी

Mumbai Indians IPL 2027 Retention List: मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरवर विश्वास कायम ठेवला आहे. तर तीन खेळाडूंना रिलीज केलं आहे.

IPL 2027 Retention: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मोठी नावं बाहेर! ट्रेंट बोल्टसह 'हे' दिग्गज 3 खेळाडू MI मधून रिलीज, पाहा संपूर्ण यादी
Mumbai Indians Three Bowlers Released Ahead of IPL 2027
| Updated on: Nov 17, 2026 | 7:09 PM
Share

आज सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींनी रिलीज केलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. मथिशा पाथिराना आणि बोल्ट यांनाही फ्रँचायझींनी रिलीज केले आहे. मुंबई इंडियन्सनेही मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने तीन महत्त्वाच्या खेळाडूंना रिलीज केलं आहे.

आयपीएल 2027 च्या आधी मुंबई इंडियन्सने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात मोठा बदल केला आहे. अर्शदीप सिंगच्या समावेशामुळे जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग ही गोलंदाजी करणारी जोडी संघाची पसंतीची जोडी बनली आहे. परिणामी फ्रँचायझीने अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांना संघातून मुक्त केले आहे. तसेच अल्लाह गजनफरलाही रिलीज करण्यात आले आहे.

ट्रेंट बोल्ट हा बऱ्याच काळापासून मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणाचा एक महत्त्वाचा भाग होता. पण गेल्या हंगामात त्याला पाच सामन्यांमध्ये केवळ दोन बळी मिळवता आले. त्याचा इकॉनॉमी रेट 11.62 होता. दुसरीकडे दीपक चहरने आठ सामन्यांमध्ये आठ बळी घेतले. पण त्याचा इकॉनॉमी रेट 10.39 होता. त्यांची कामगिरी आणि संघाची रचना लक्षात घेऊन मुंबईने या दोन्ही खेळाडूंना मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

या दोन खेळाडूंना मुक्त केल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या तिजोरीत 21.75 कोटी रुपयांची भर पडली आहे. ज्यामुळे संघाला मिनी-लिलावात नवीन खेळाडूंवर गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. मुंबईने ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, एएम गझनफर, अथर्व अंकोलेकर, केशव महाराज, मोहम्मद इझार, दानिश मलेवार, मयंक मार्कंडे, मयंक रावत यांना सोडले आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.

आयपीएल लिलावापूर्वी त्याला संघातून वगळले जाईल या अटकळांना पूर्णविराम देत मुंबई इंडियन्सने अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरवरील विश्वास कायम ठेवला आहे. त्याला आगामी हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून ट्रेडद्वारे मुंबईत आलेल्या शार्दुलचा गेल्या हंगामातील खेळ साधारणच होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 12 बळी घेतले, पण 12.27 च्या उच्च इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

Follow Us
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?