AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्तिकी एकादशीला करा या 5 वस्तूंचे दान; घरात नांदेल सुख-समृद्धी

Kartiki Ekadashi 2026: २० नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. कार्तिकी एकादशीला पूजा करण्यासोबतच दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे.

कार्तिकी एकादशीला करा या 5 वस्तूंचे दान; घरात नांदेल सुख-समृद्धी
| Edited By: | Updated on: Nov 17, 2026 | 10:03 PM
Share

२० नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे याला देवउठनी एकादशी असे देखील म्हटले जाते. सनातन धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात आणि विशेषतः कार्तिकी एकादशीला केलेल्या दानधर्मातून अक्षय पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. या दिवशी पूजा करण्यासोबतच गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र आणि इतर वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे हे जाणून घ्या.

अन्नदान आणि पिवळ्या वस्तूंचे दान शास्त्रांमध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. कार्तिकी एकादशीला गरजू व्यक्तींना तांदूळ, गहू, गूळ, तीळ आणि हंगामी भाज्यांचे दान करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, असे दान केल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि पितर प्रसन्न होतात. भगवान विष्णूंना हा दिवस समर्पित असल्याने हळद, हरभरा डाळ, केळी आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे गुरू ग्रह मजबूत होतो आणि विवाहासह इतर शुभ कार्यांमधील अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. वस्त्रदान आणि हंगामी फळांचे दान कार्तिक महिन्यात थंडीची चाहूल लागते. त्यामुळे गरजू व्यक्तींना लोकरीचे कपडे, ब्लँकेट किंवा स्वच्छ वस्त्रांचे दान करावे. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे शनी आणि राहूचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि जीवनात सुख-शांती येते. तसेच कार्तिकी एकादशीला ऊस, शिंगाडे, रताळी, आवळा आणि बोर यांसारखी हंगामी फळे किंवा पदार्थ ब्राह्मण अथवा गरजू व्यक्तींना दान करणे शुभ मानले जाते. यामुळे संततीसुख आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. दीपदानाचे विशेष महत्त्व कार्तिक महिन्यात दीपदानाला विशेष महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ, मंदिरात किंवा नदीच्या काठी तुपाचा अथवा तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार, दीपदान केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि अकाली मृत्यूचे भय कमी होते. तसेच माता लक्ष्मीची कृपा राहून आर्थिक अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. विधीपूर्वक दीपदान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?