कोल्हापूरात जिल्हा परिषदेत निधी वाटपावरुन काँग्रेसचा उपोषणाचा इशारा
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निधीच्या असमान वाटपावरून राजकारण पेटले आहे. विरोधी गटातील काँग्रेस परिषद सदस्यांनी आता निधी मिळावा यासाठी थेट या परिषदेच्या दारातच उपोषणाचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निधी वाटपावरून सध्या चांगलाच गोंधळ उडाला आहे. विरोधी गटातील काँग्रेसच्या या परिषद सदस्यांनी आता निधी मिळावा यासाठी थेट या परिषदेच्या दारातच उपोषणाचा इशारा दिला आहे. काँग्रेस सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेषतः कमी निधी मिळाल्याने नाराज असलेले सत्ताधारी गटातील काही सदस्य देखील या आंदोलनाचे समर्थन करत आहेत.त्याच जाहीर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये सत्ताधारी गटाच्या प्रत्येक सदस्याला दीड कोटी रुपये तर विरोधी गटाच्या सदस्यांना 50 लाखाचा निधी मिळणार आहे.
निधी वाटपातील या असमतोलामुळे काँग्रेसचे सगळेच सदस्य आता आक्रमक झाले आहेत. या सदस्यांनी निधी मिळवण्यासाठी आता आंदोलनाचे हत्यार उपस्थित असून जिल्हा परिषदेच्या दारातच उपोषणाला बसण्याचा इशारा या सदस्यांनी दिला आहे. इतकच नाही तर प्रशासनाने दाद घेतली नाही तर जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेसह जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या मांडण्याचा देखील इशारा या सदस्यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदे कडून वितरित झालेल्या निधीचे सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान वाटप केले असून जिल्हा नियोजन समितीमधील निधीबाबत विरोधी गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना असलेल्या आक्षेपावर लवकरच तोडगा काढला जाईल असे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सांगितले आहे.विषयावर येत्या 20 तारखेला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांची एक बैठक देखील बोलावली गेली आहे.
