Maharashtra News LIVE : बुलडाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर, कारवाईत 14 सिलेंडर जप्त…
Maharashtra News LIVE Updates : देशात अनेत ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येत आहे... तर युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
गॅस एजन्सी उघडण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या रांगा
रांजणगाव येथील एचपी गॅस एजन्सी समोर पहाटेपासूनच नागरिक गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे. पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे, 150 पेक्षा अधिक गॅस टाक्या घेऊन नागरिक रांगेत उभे.
-
गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही
शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहत ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि शेगाव येथील सुप्रसिद्ध अशी कचोरी… देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग, कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.. मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसला आहे .
-
-
नाशिक शहरात अनेक ठिकाणचे सकाळी सुरू असलेले नाश्ता सेंटर बंद
गॅस तुटवड्यामुळे नाश्ता देण्यास अडचण. काल पर्यंत ज्या ठिकाणी नाश्त्यासाठी गर्दी, त्याठिकाणी आज शुकशुकाट.. नाश्ता एवजी लागले फ्रुट चे स्टॉल. गॅस नसल्याने आता अनेकांनी नाश्ता एवजी फ्रुट स्टॉल लावायला केली सुरुवात..
-
ठाण्यातील स्मार्ट पार्किंग धोरणाची वाट मोकळी होणार
महासभेत शुल्क वाढीसह धोरण मंजुरीचा प्रस्ताव ठेवला जाणार. गेल्या तीन वर्षापासून कागदावर अडकून पडलेल्या स्मार्ट पार्किंग धोरणाच्या गाडीला वाट मोकळी करून देण्याची तयारी ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. शहरातील सुमारे 186 रस्त्यांचे अ ब क आणि ड अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येऊन जवळपास 11 हजाराहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची क्षमता असल्याचा निर्वाळा महापालिकेने दिला..
-
सोलापूर ते मुंबई विमान प्रवासाच्या एका तिकिटासाठी मोजले तब्बल 42 हजार रुपये
त्याचबरोबर सोलापूर ते गोवा विमान प्रवासासाठी एका तिकिटाला 18 हजार रुपये इतके उच्चांकी भाडे. सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्यापासूनचे तिकिटाला सर्वात उच्चांकी दर असल्याचे पाहायला मिळाले. लगीन सराई तसेच व्यावसायिक कामानिमित्त सोलापूर मुंबई आणि पर्यटनासाठी सोलापूर गोवा विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे
-
-
नाशिकच्या काळाराम मंदिरवर अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार
नाशिकच्या काळाराम मंदिरवर अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार आहेत. मंदिरावर 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय आहे. धर्मध्वज उभारणीचा संपूर्ण खर्च मंदिर संस्थान करणार आहे. भाविकांच्या मागणीनंतर विश्वस्तांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
-
शॉर्ट सर्किटने ट्रॅव्हल्सला भीषण आग… आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक
संभाजीनगर ते सांगली मध्ये आलेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल्स गाडीला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. सांगलीच्या मारुती चौकात सकाळी सहा वाजता आल्यानंतर ही आग लागली. गाडीत सहा प्रवाशी होते ते सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणली. मात्र ट्रॅव्हल्स जळुन खाक झाली. यामध्ये प्रवास्याची बॅग ही जळुन खाक झाल्या. यावेळी बघ्याची एकच गर्दी झाली होती.
-
-
इराण–अमेरिका तणावाची झळ डोंबिवलीला! गॅस टंचाईमुळे तरुणाचे ‘हॉटेल साहेबराव’ला टाळे
इराण–अमेरिका तणावाची झळ डोंबिवलीला! गॅस टंचाईमुळे तरुणाचे ‘हॉटेल साहेबराव’ला टाळे लागले आहेत. कर्ज काडून अवघ्या तीन महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकाने मोठ्या आशेने व्यवसाय सुरू केला होता. मात्र कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाक ठप्प झाल्याने ग्राहकांना सेवा देणे अशक्य झाल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आलीये.
-
कल्याण आधारवाडी जेलसमोर फटाक्यांची आतषबाजी;
कल्याण आधारवाडी जेलसमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिक्षा भोगत असलेल्या ‘सत्या भाई’चा त्याच्या पंटरांकडून जेलच्या मुख्य गेटसमोर फटाके फोडत वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशात कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे.
-
नाशिक – अग्निशमन विभागाकडून पुन्हा फायर ऑडिटसाठी नोटीस
नाशिक – अग्निशमन विभागाकडून पुन्हा फायर ऑडिटसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. अग्निप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या आस्थापनांच्या इमारतींवर कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याचा तसेच इमारतीचा वापर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
-
कळंब तालुक्यात हरभरा पिकाची गंजी पेटवली; दोन एकरवरील पीक जळून खाक
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सापनाई गावातील शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांच्या शेतात काढून ठेवलेल्या हरभरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सुमारे दोन एकरवरील काढून ठेवलेले हरभरा पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
-
गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही
शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहत ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि शेगाव येथील सुप्रसिद्ध अशी कचोरी… देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग, कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.. मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसला आहे . व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगाव येथील कचोरीचे ही भाव वाढले आहेत.. गेल्या आठवड्यात शेगाव कचोरी दहा रुपयाला मिळत होती, ती आता दोन रुपयांनी वाढून बारा रुपयाला झाली आहे.. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने ही भाव वाढ केल्याचं बोललं जात आहे.. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य कचोरी खवय्यांना बसत असल्याचा समोर येत आहे..
-
केज तालुक्यातील नाव्होलीत संपत्तीच्या वादातून लेकाकडूनच बापाला अमानुष मारहाण
बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात सुभाष ठोंबरेंसह त्यांच्या मुलीला आणि जावयाला मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सुन सारिका ठोंबरे यांनी काही लोकांना सोबत घेऊन संपत्तीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकुन लोखंडी रॉड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये सुभाष ठोंबरे हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात 10 आरोपींच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. मुलाकडूनच बापाला अशाप्रकारे अमानुष झालेल्या मारहाणीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमीने आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बुलडाणा शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारींनंतर, जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.. बुलडाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी शहरातील विविध हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली.. दरम्यान 14 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. तर काही हॉटेल मालकांनी कारवाईची कुणकुण लागताच सिलिंडर लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला. या दरम्यान अनेक फसवणुकीचे प्रकार देखील समोर येत आहेत. डोंबिवलीत ‘गॅस कनेक्शन अपडेट’च्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. कपडा व्यापाऱ्याला 14 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. महानगर गॅसचे कनेक्शन बंद होणार सांगत व्यापारी अरुण मोरे यांची 14.46 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. तर अहिल्यानगर येथील कोपरगाव याठिकाणी गॅस संकटावर संजिवनी उद्योग समुह आणि साखर कारखान्याने नवा प्रयोग सुरु केला आहे. कंपनीने इथेनॉलवर चालणारा स्टोव्ह तयार केला आहे. याचप्रकारे युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.
Published On - Mar 16,2026 8:12 AM
