3 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
थंडीत उष्ण पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे खजुर खाल्ल्याने देखील मोठा फायदा होतो.
थंडीत खजुर खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणते महत्वाचे फायदे होतात हे पाहूयात. खजुरात फायबर, पोटेशियम, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम, एंटी-ऑक्सीडेंट, व्हिटामिन - बी-६, कॉपर आणि मॅगनीज सारखी पोषक तत्वे असतात.
हृदयाच्या आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हृदयाला मजबूत ठेवायचे असेल तर खजुराचा समावेश आहारात करावा.
रक्ताची कमतरता असेल तरी खजूर खाल्ल्यास आरामात कमतरता दूर होते. यातील आयर्न शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते.
खजूरात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खजूर खाल्ल्याने पोटाची सफाई होते.
खजूरात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडांच्या मजबूतीसाठी ते फायद्याचे असते.
खजूर प्रमाणाच्या बाहेर खाणे चांगले नसते. त्यामुळे मर्यादित प्रमाण याचे सेवन करावे.