AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्फोटकांचे आवाज, रात्री आकाशात दिसणारी क्षेपणास्त्रे..; दुबईत अडकलेल्या स्मिता गोंदकरची एकनाथ शिंदेंनी केली मदत

दुबईत अडकलेल्या स्मिता गोंदकरने तिचा भीतीदायक अनुभव सांगितला. स्फोटकांचे आवाज, हादरणाऱ्या खिडक्या, रात्रीच्या वेळी आकाशात उडणारी क्षेपणास्त्रे.. हे सर्व तिने अनुभवलंय. सतत विमानांची उड्डाणं रद्द होत असल्याने तिला भारतात परतता येत नव्हतं.

स्फोटकांचे आवाज, रात्री आकाशात दिसणारी क्षेपणास्त्रे..; दुबईत अडकलेल्या स्मिता गोंदकरची एकनाथ शिंदेंनी केली मदत
Smita Gondkar and Eknath ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2026 | 8:26 AM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण जगात तणावाचं वातावरण आहे. त्यानंतर इराणनेही कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी तळांवर हल्ले केले. या सर्वांचा परिणाम जगातील विमान उड्डाणांवर झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी पश्चिम आशियातील त्यांची विमानसेवा स्थगित केली आहे, तर काही उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशातच मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने तिचा दुबईतील अत्यंत भीतीदायक अनुभव सांगितला आहे. स्मिता तिच्या कुटुंबीयांसोबत दुबईत अडकली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना भारतात परत आणण्यासाठी मदत केली आहे. याबद्दलची एक पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

स्मिता गोंदकरची पोस्ट-

‘गेले काही दिवस माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. स्फोटकांचे मोठे आवाज, त्यामुळे हादरणाऱ्या खिडक्या, रात्रीच्या वेळी आकाशात उडणारे क्षेपणास्त्रे, इंटरसेप्शन्स, मातीचे ढिगारे, दिवसाही आकाशात लहान ढगांसारखी एखादी रचना दिसणं.. ही परिस्थिती निवळेल आणि आम्ही लवकरच घरी परतू अशी आम्हाला आशा होती. परंतु हवाई क्षेत्र बंद असल्याने, वारंवार बुकिंग आणि चेक-इन करूनही दररोज विमान उड्डाणं रद्द होत असल्याने आणि माझ्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत प्रवास करत असल्याने घरी परतणं जवळपास अशक्य वाटू लागलं’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

याविषयी तिने पुढे लिहिलं, ‘मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगेश देसाई आणि अतिरिक्त आयुक्त राहुल जेठे यांचे मनापासून आभार मानू इच्छिते. त्यांनी त्वरित हस्तक्षेप करून सातत्याने मदत केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या राहण्याची, पिकअपची व्यवस्था करण्यापासून ते भारतात सुरक्षित परतण्यापर्यंत त्यांनी केलेले प्रयत्न खरोखरच आश्वासक होते. तुमच्या जलद कृती आणि पाठिंब्यामुळे फक्त माझ्या कुटुंबालाच नाही तर अडकलेल्या इतर अनेक भारतीयांना सुरक्षितपणे घरी परतता आलं. अशा गंभीर परिस्थितीत तुमचा त्वरित प्रतिसाद आणि वचनबद्धता हे मजबूत नेतृत्व आणि नागरिकांबद्दलची खरी काळजी दर्शवते. अशा कठीण काळात आपलं सरकार आपल्या जनतेसोबत खंबीरपणे उभं असल्याचं पाहून मला एक भारतीय म्हणून खूप अभिमान आहे.’

याआधी कुवैतमध्ये अडकलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या मुलाचीही एकनाथ शिंदेंनी मदत केली होती. त्यानंतर तिनेही आभार मानणारी पोस्ट शेअर केली होती.

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...