AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर

Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर

| Updated on: Aug 01, 2026 | 4:22 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये, यासाठी वस्तुस्थिती समोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले की, सिद्धिविनायक न्यासाच्या काही विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन मंदिरातील देणगी व्यवस्थेची चौकशी करण्याची विनंती केली होती. मात्र, त्या पत्रात कुठेही “चोरी” किंवा “18 कोटी रुपयांचा घोटाळा” असा उल्लेख करण्यात आलेला नाही. या पत्राचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी मंदिराच्या दानपेटीत दरवर्षी सुमारे 40 ते 45 लाख रुपये जमा होत होते. मात्र, मंदिर परिसरात करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि व्यवस्थापनातील बदलांमुळे गेल्या महिनाभरात ही रक्कम 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नात झालेली वाढ ही व्यवस्थापनातील सुधारणा आणि पारदर्शकतेचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदा सरवणकर यांनी मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहितीही दिली. काही कंत्राटी कर्मचारी ऑनलाइन माध्यमातून दर्शनासाठी पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तसेच, हातचलाखी करून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, मंदिरातील पुजाऱ्यांना भक्तांकडून मिळणारी रक्कम शासनाच्या नियमांनुसार दानपेटीत जमा करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व उपाययोजनांमुळे मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली असून, सिद्धिविनायक मंदिर न्यास गेल्या दोन वर्षांपासून पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने काम करत असल्याचा दावाही सदा सरवणकर यांनी केला.

Published on: Aug 01, 2026 04:22 PM

Follow Us