AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार आणि खासदारांनंतर आता पंचायत समित्यांवरही शिंदेंचा कब्जा, कोणत्या तालुक्यात कोणाची वर्णी?

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. चिपळूणमध्ये अजित पवार गटाला संधी मिळाली असून, पाच तालुक्यांत महिलांना सभापती पद देऊन शिवसेनेने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.

आमदार आणि खासदारांनंतर आता पंचायत समित्यांवरही शिंदेंचा कब्जा, कोणत्या तालुक्यात कोणाची वर्णी?
eknath shinde
| Updated on: Mar 09, 2026 | 9:01 AM
Share

राज्यातील राजकारणात सध्या विविध घडामोडी सुरु आहेत. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेने ८ जागांवर विजय मिळवत बाजी मारली आहे.

संगमेश्वर आणि चिपळूणवरुन रस्सीखेच

महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार चिपळूण पंचायत समितीचे सभापती पद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले असून, उर्वरित सर्व ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. या निवडणुकीपूर्वी संगमेश्वर आणि चिपळूण या दोन जागांवरून महायुतीमध्ये (शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी) काही प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप केला. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर संगमेश्वरचे पद शिवसेनेकडे तर चिपळूण राष्ट्रवादीकडे ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडून आलेले हे सर्व पदाधिकारी आगामी सव्वा वर्षांच्या (१५ महिने) कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहतील.

पंचायत समिती सभापती उपसभापती पक्ष
मंडणगड प्रणाली संदेश चिले दिपक शंकर मालुसरे शिवसेना (शिंदे)
खेड आफिया नजीब पालेकर सुनिल बाबाराम मोरे शिवसेना (शिंदे)
दापोली उन्मेष रामचंद्र राजे नम्रता प्रदिप तोडणकर शिवसेना (शिंदे)
चिपळूण संदेश मनोहर आयरे राष्ट्रवादी (अजित पवार)
गुहागर प्रणव प्रमोद पोळेकर शिवसेना (शिंदे)
देवरुख शर्वरी प्रथमेश वेल्ये शिवसेना (शिंदे)
रत्नागिरी प्रविण धोंडू पांचाळ गजानन धर्माजी धनावडे शिवसेना (शिंदे)
राजापूर नंदिनी नितिन कदम अभिजित यशवंत गुरव शिवसेना (शिंदे)
लांजा मानसी सिध्देश्वर आंबेकर आदेश दत्तात्रय आंबोळकर शिवसेना (शिंदे)

महिला सक्षमीकरणाचा संदेश

अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर पंचायत समित्यांवरही कब्जा मिळवून शिवसेनेने कोकणातील आपला गड मजबूत केला आहे. लांजा, राजापूर, देवरुख, खेड आणि मंडणगड या पाच महत्त्वाच्या तालुक्यांत महिलांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. ही संधी देऊन शिवसेनेने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे. खेडमध्ये सौ. आफिया पालेकर यांची निवड करून पक्षाने सर्वसमावेशकतेवर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी