AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुरीच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजलं, कर्डिलेंचा वारसदार की नवा चेहरा? कोणाचं नाव आघाडीवर?

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २३ एप्रिल रोजी मतदान आणि ४ मे रोजी निकाल लागणार असून अक्षय कर्डिले, संग्राम जगताप आणि प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुरीच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजलं, कर्डिलेंचा वारसदार की नवा चेहरा? कोणाचं नाव आघाडीवर?
Akshay Kardile
| Updated on: Mar 16, 2026 | 7:37 AM
Share

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र असलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ६ वेळा आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या २३ एप्रिल रोजी राहुरीत मतदान पार पडणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होईल. या घोषणेमुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

निवडणूक झाली तरी विजय आमचाच

दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हे या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ते या मतदारसंघातून सक्रिय होते. विशेष म्हणजे, त्यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी अक्षय कर्डिले यांच्यासाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. कर्डिले साहेब हे ६ वेळा आमदार होते, जनतेचा आशीर्वाद अक्षयच्या पाठीशी आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न असेल, पण निवडणूक झाली तरी विजय आमचाच असेल, असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.

राहुरीच्या राजकारणात तनपुरे फॅक्टरचा प्रभाव

तर दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकते. तनपुरे हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांचे जाहीर कौतुक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार, असे त्यांनी म्हटल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. मात्र ते भाजपच्या वाटेवर आहेत की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरीच्या राजकारणात तनपुरे फॅक्टरचा नेहमीच प्रभावी राहिला आहे.

निवडणूक बिनविरोध व्हावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती पाहता, महायुती ही जागा भावनिक मुद्द्यावर बिनविरोध काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही हाय-प्रोफाईल जागांवर एकाच वेळी मतदान होणार असल्याने राज्याचे राजकीय वातावरण तापणार आहे. येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी या दोन्ही मतदारसंघासाठी निवडणूक पार पडेल. त्यानतंर ४ मे २०२६ रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. ही निवडणूक विकासकामे, सहानुभूतीची लाट या मुद्द्यावर लढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल