20 नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

सतत थकवा, चक्कर येतेय? फक्त  या 5 भाज्या खा, 1 आठवड्यातच झटकन वाढेल रक्त

रक्ताची पातळी वाढवण्यास मदत शरीरात हिमोग्लोबीन कमी झालं की सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे  अशी लक्षणे दिसू लागतात. याचसाठी एक उपाय  म्हणून या भाज्या खाल्यात तर रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होऊ शकते

पालक पालक या हिरव्या पालेभाजीत भरपूर आयर्न  आणि फोलेट असते. पालकाची भाजी, सूप किंवा डाळीत पालक घालून तुम्ही आहारात समावेश  करू शकता.

शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांमध्ये रक्त वाढवण्यासाठी आयर्न , फोलेट आणि बरेच पोषक घटक असतात.  शेवग्याची भाजी रक्तवाढीबरोबरच इतर बऱ्याच कारणांसाठी आरोग्यदायी आहे.

मेथीची भाजी मेथीच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात . मेथीची भाजी किंवा डाळीत मेथी घालूनही खाता  येत. मेथीची भाजी खाल्ल्याने रक्त वाढतेच.  याशिवाय केसांचीही चांगली वाढ होते.

लाल माठ आणि हिरवा माठ लाल माठ आणि हिरवा माठ या दोन्ही भाज्या आहारासाठी चांगल्या आहेत. माठाची भाजी  खाल्ल्याने त्वचेवर ग्लो येण्यासही मदत होते. 

चाकवत चाकवत ही पौष्टिक पालेभाजी आहे. यात  आर्यनसह भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि  खनिजे आढळतात. चाकवताची भाजी  डाळीसोबत खाता येते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक  स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा  कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)