AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, तो फोटो व्हायरल होताच उडाली झोप, जय हो…

भारत गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करताना दिसतोय. त्यामध्येच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात आले होते. यावेळी अनेक करार करण्यात आली. मॅक्रॉन यांनी खास फोटोही शेअर केला.

भारताचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, तो फोटो व्हायरल होताच उडाली झोप, जय हो...
Emmanuel Macron and PM Modi
| Updated on: Feb 18, 2026 | 10:01 AM
Share

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दाैऱ्यावर होते. त्यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा होत्या. फ्रान्स आणि भारताची मैत्री अत्यंत जुनी आहे. आता या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो बरेच काही सांगून जाताना दिसतोय. फोटो शेअर करताना इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी थेट जय हो असे कॅप्शन दिले. मॅक्रॉन यांनी मुंबईत भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरमला संबोधित केले. मॅक्रॉन यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या होत्या. मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा खास फोटो शेअर केला. हा फोटो पाहून पाकिस्तानचा जळफळाट नक्कीच उठला असेल. भारत-फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होणार आहे. मुळात म्हणजे भारत आणि फ्रान्स नेहमीच चांगले भागीदार राहिले आहेत.

इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, जागतिक चर्चा आता भारत करतो की नाही याबद्दल नाही तर भारतासोबत कोण नवोन्मेष करू इच्छिते याबद्दल आहे. फ्रान्स हा भारतासोबत ठामपणे उभा आहे आणि असेल असेही त्यांनी म्हटले. मॅक्रॉन पुढे म्हणाले, भारत फ्रेंच भागीदारी फक्त मोठ्या तांत्रिक प्रगतीपुरती मर्यादित नाही तर ती दैनंदिन जीवन निरोगी आणि सुरक्षित बनवण्यावर देखील लक्ष केंद्रित करते.

पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे भारतात स्वागत केले आणि थेट युरोपचे प्रमुख प्रवेशव्दार म्हणून फ्रान्सचा उल्लेख केला. PM मोदींनी 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हटले. भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी दृढ झाल्याचे नरेंद्र मोदी यांनी यादरम्यान म्हटले. मॅक्रॉन यांनी यावेळी दोन्ही देशांमध्ये मोठे करार झाल्याची माहिती दिली.

अमेरिकेने भारतावर लाववेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली. युरोपियन युनियनसोबत भारताने मोठे करार केले. त्यामध्येच आता फ्रान्ससोबत भारताने मोठी भागीदारी केली. भारत आणि फ्रान्समधील मैत्री पाहून अनेकांनी धसका घेतल्याचेही स्पष्ट आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान