AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो सामना, कोण जिंकणार?

Australia vs India Women 2nd T20i Preview : ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमसाठी गुरुवार निर्णायक ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे कांगारुंसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे.

IND vs AUS : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो सामना, कोण जिंकणार?
Harmanpeet Kaur Shafali Verma Team IndiaImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 19, 2026 | 2:11 AM
Share

वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात सध्या टी 20i मालिका खेळत आहे.  उभयसंघात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सध्या टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. यजमान संघाची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात कांगारुंचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात यजमान पाहुण्या संघासमोर कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाची विजयी सलामी

टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात रविवारी 15 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 21 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 133 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने खोडा घातला. भरताने तोवर 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लावण्यात आला. भारताने हा सामना 21 धावांनी जिंकला. भारताने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मालिका गमवायची नसेल तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याच्या निकालाकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती

उभयसंघातील दुसरा सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. सोफी मोलिनेक्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

प्रतिका रावलचा समावेश

दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात सलामीवीर प्रतिका रावल हीचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान ही मालिका होणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा