AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs ZIM T20 WC Live Score : झिंबाब्वे चौथ्या सामन्यासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला लोळवणार?

Sri Lanka vs Zimbabwe, T20 world Cup 2026 Live Score Updates: झिंबाव्वे या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. तसेच झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियालाही लोळवलंय. त्यामुळे झिंबाव्वे विरुद्ध श्रीलंका सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

SL vs ZIM T20 WC Live Score : झिंबाब्वे चौथ्या सामन्यासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला लोळवणार?
Zimbabwe vs Sri LankaImage Credit source: @ZimCricketv and @OfficialSLC X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 19, 2026 | 1:41 AM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत बुधवारी 18 फेब्रुवारीला पाकिस्तानने नामिबियावर मात केली. पाकिस्तानने या विजयासह सुपर 8 फेरीत प्रवेश मिळवला. पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहचणारी आठवी टीम ठरली. यासह सुपर 8 चं चित्र स्पष्ट झालं. आता साखळी फेरीतील शेवटचे काही सामने बाकी आहेत. गुरुवारी 19 फेब्रुवारीला 3 सामने होणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांनी सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी सुपर 8 च्या आधी सराव आणि इतर प्रयोगाच्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा असणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? तसेच इतर 2 सामन्यांच कुणासमोर कुणाचं आव्हान असणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे आमनेसामने

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना 19 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत अजिंक्य आहेत. श्रीलंकेने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर झिंबाब्वेने 2 सामने जिंकले आहेत. तर झिंबाब्वेचा आयर्लंड विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. झिंबाब्वेचे यासह 5 गुण झाले आणि त्यांनी सुपर 8 मध्ये धडक दिली. तर पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियाचं साखळी फेरीतूनच आव्हान संपुष्टात आलं. अशात आता गुरुवारी होणाऱ्या सामन्यात झिंबाब्वे-श्रीलंकेपैकी कोणता संघ विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या सामन्यात विंडीज-इटली भिडणार

गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात विंडीज विरुद्ध इटली आमनेसामने असणार आहेत. विंडीज अजिंक्य आहे. विंडीजने सलग 3 सामने जिंकलेत. तर इटलीचं आव्हान संपुष्टात आलंय. मात्र इटलीने खेळलेल्या 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. अशात इटली आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करुन विंडीजला पराभवाचा धक्का देणार का? याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

अफगाणिस्तान-कॅनडा सामना

अफगाणिस्तान आणि कॅनडा दोन्ही संघ एकमेकांसमोर गुरुवारी या मोहिमेतील आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांचं साखळी फेरीत पॅकअप झालंय. अफगाणिस्तानने गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र अफगाणिस्तान यंदा लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली. अफगाणिस्तानने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर कॅनडाने सलग तिन्ही सामने गमावलेत. त्यामुळे या सामन्यात कोण मैदान मारतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा