AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत जेलची हवा विसरले आहेत, ते स्वत:…, त्या व्हिडीओवरून नार्वेकरांचा जोरदार टेला

संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता नार्वेकर यांनी देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

संजय राऊत जेलची हवा विसरले आहेत, ते स्वत:..., त्या व्हिडीओवरून नार्वेकरांचा जोरदार टेला
Rahul Narvekar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 7:56 PM
Share

अलिबागमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं वाद झाला असा देखील आरोप होत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता, या व्हिडीओसोबत ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा सवाल करत त्यांनी नार्वेकर यांना डिवचलं होतं, दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या व्हिडीओवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर? 

संजय राऊत यांच्या आरोपावर यापूर्वी पण बोललो नाही, आणि बोलणार पण नाही.  मी एवढेच सांगू इच्छितो हे त्यांच्या सर्व मनातल्या कल्पना आहेत. हे त्यांचे जुने दुखणे आहे, ते आता उफाळून आले आहे.  म्हणून संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सर्वांना माहीत आहे.  त्यांनी जे आरोप केले आहे ते बिनबुडाचे आहेत. अलिबागला मी वारंवार जात असतो. माझ गाव आहे, तिथे माझी शेती आहे. तीथे मी माझी शेती बघायला गेलो होतो.   दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला त्यावेळेला तिकडे मारामारी होत होती.  म्हणून मी तिकडे सांगितलं की तुम्ही मारामारी करू नका आणि शांतपणे बसून वाद मिटवा,  त्या जागेशी माझं काही देणं घेण नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  त्यामुळे अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करण्याची संजय राऊत यांची जुनीच सवय आहे.   त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील ते समोर आणू द्या, त्यांना चोख उत्तर दिलं जाईल.  संजय राऊत यांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही, पण दिडशे वर्षांपासून आमचं अलिबागमध्ये वास्तव्य आहे, आमची तिथे जमीन आहे , त्यांना खोट्या अफवा पसरवायला आवडतात, त्यांना  लखलाभ, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये राहून आलेले आहेत,  ते लोकांना काय शिकवण देणार? संजय राऊत जेलची हवा विसरलेले आहेत,  आसा टोलाही यावेळी राहुल नार्वेकर यांनी लगावला आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा