AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zeenat Aman : तो माझी फसवणूक करतोय हे माहित असूनही मी 12 वर्षे…प्रसिद्ध अभिनेत्यासोबतच्या नात्याबद्दल झीनत अमान यांचं वक्तव्य

Zeenat Aman On Relationship With Actor : प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी एका मुलाखतीत अभिनेत्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलेलं.

Zeenat Aman : तो माझी फसवणूक करतोय हे माहित असूनही मी 12 वर्षे...प्रसिद्ध अभिनेत्यासोबतच्या नात्याबद्दल झीनत अमान यांचं वक्तव्य
| Updated on: Nov 19, 2026 | 6:36 PM
Share

झीनत अमान यांनी करिअरच्या शिखरावर असताना, 1985 मध्ये अभिनेता मजहर खानशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या. पहिल्याच वर्षात अभिनेत्रीला जाणवलं की तिनं चुकीचा निर्णय घेतला आहे. असं असूनही, झीनत यांनी आपल्या दोन मुलांसाठी 12 वर्षे हे नातं टिकवून ठेवलं होतं.

झीनत अमान यांनी सांगितलेली आपबिती

सिमी गरेवालला दिलेल्या एका मुलाखतीत, झीनत अमाननं त्यांच्या वैवाहिक जीवनातील कठीण काळाबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी 1985 मध्ये मजहर खानशी लग्न केलं. लग्नाच्या पहिल्याच वर्षात माझ्या लक्षात आलं की, मी चूक केली आहे. पण मजहरशी लग्न करणं हा माझा स्वतःचा निर्णय होता, आणि तोही सर्वांच्या इच्छेविरुद्ध. म्हणून, मी विचार केला की, मी हे नातं सुधारण्याचा प्रयत्न करेन. मी असंही म्हणत नाही, की ते त्याच्यासाठी चांगलं होतं. पहिल्या वर्षापासूनच गोष्टी खूप कठीण होत्या. मी गरोदर होते आणि मजहर माझ्यासोबत नव्हता. दुसरं म्हणजे, त्यावेळी ‘स्टारडस्ट’ मासिकात एक मोठा लेख प्रसिद्ध झाला होता, ज्यात म्हटलं होतं की, मजहर दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर होतं आणि ते खरंही होतं.’

झीनत म्हणाल्या, ‘जेव्हा माझा मुलगा जन्माला आला, तेव्हा मला वाटलं की मी हे लग्न संपवावं. आम्ही यावर चर्चाही केली, पण नंतर मला वाटलं की, माझ्या मुलाला एक संधी मिळायला हवी, म्हणून मी विवाहित राहण्याचा निर्णय घेतला. मी सहजासहजी थांबून हार मानली नाही, तर हे नातं सुधारण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न केले.’

‘जेव्हा माझा धाकटा मुलगा पाच वर्षांचा झाला, तेव्हा मी काम करण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधीच मजहर आजारी पडला. त्यानंतर, मी पाच वर्षे त्याच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी लढले, तो काळ खूप कठीण होता. मी माझ्याकडून शक्य असलेले सर्व प्रयत्न करून पाहिले. आम्ही मुंबईतील प्रत्येक रुग्णालयात गेलो. मी इंजेक्शन द्यायला, मलमपट्टी करायला शिकले. मी परदेशात जाऊन सर्वोत्तम डॉक्टर शोधले. जेव्हा सर्व काही ठीक झालं, तेव्हा त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. मी मानसिकदृष्ट्या खचण्याच्या मार्गावर होते. 12 वर्षे, ‘तू कशी आहेस?’ असं विचारणारं कोणीही नव्हतं.’ असं झीनत यांनी शेवटी सांगितलेलं.

Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज