AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola News: गरिबीची क्रुर थट्टा! थेट रुग्णालयात पोहोचला वसुली एजंट; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा

उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेजवळ चक्क आयडीएफसी बँकेचा वसुली कर्मचारी कर्जवसुलीसाठी पोहोचला.  या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात असून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे.

Akola News: गरिबीची क्रुर थट्टा! थेट रुग्णालयात पोहोचला वसुली एजंट; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा
| Updated on: Nov 19, 2026 | 6:23 PM
Share

गणेश सोनोने, प्रतिनिधी: अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  कर्जवसुलीच्या नावाखाली आता थेट रुग्णालयातही बँकेचे कर्मचारी पोहोचू लागले आहेत का? असा संतप्त सवाल अकोल्यातील एक घटनेनंतर उपस्थित होत आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेजवळ चक्क आयडीएफसी बँकेचा वसुली कर्मचारी कर्जवसुलीसाठी पोहोचला.  या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात असून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे.  या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

संतापजनक! रुग्णालयात पोहोचला वसुली कर्मचारी

समोर आलेल्या माहितीनुसार,  अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ही घटना घडली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वैशाली गोपाल इंगळे या महिलेची प्रकृती आणि परिस्थिती लक्षात न घेता आयडीएफसी बँकेचा वसुली कर्मचारी थेट रुग्णालयात पोहोचला.. कर्जाच्या वसुलीसाठी रुग्णालयात आलेल्या या कर्मचाऱ्याच्या कृतीमुळे संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत संबंधित वसुली कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले असून यावेळी झालेल्या चर्चेचा व्हिडिओही समोर आला आहे.  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक परिस्थितीचा विचार न करता अशा पद्धतीने वसुली करणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेतकरी संघटना, ठाकरे गट आक्रमक! 

दरम्यान, सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने आदेश काढावेत, अन्यथा कर्जवसुलीसाठी येणाऱ्या एजंटांना शेतकरी संघटना जशास तसे उत्तर देईल, असा आक्रमक पवित्रा घेत शेतकरी संघटनेचे लक्ष्मीकांत कौठकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. दुसरीकडे  या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून पोलिसांनी तातडीने दखल न घेतल्यास येत्या शनिवारी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन शिवसेना स्टाईलने जाब विचारणार असल्याचा इशारा दिला आहे.

Follow Us
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी