Aamir Khan : आमिर खान होणार मालामाल! अभिनेत्यानं भाडयानं दिली 3 अपार्टमेंट, दरमहिन्याला मिळणार…किंमत ऐकून व्हाल अचंबित
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं मुंबईतील त्याचे 3 अपार्टमेंट भाड्याने दिले असून अभिनेत्याला दर महिन्याला लाखो रुपये मिळणार आहेत.

अभिनेता आमिर खान नेहमीच चर्चेत असतो. आता त्यानं मुंबईतील आपले तीन आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानं हे अपार्टमेंट चार वर्षांसाठी भाड्याने दिले आहेत. CRE मॅट्रिक्सनुसार, आमिर खाननं हे तिन्ही अपार्टमेंट दरमहा 38 लाख रुपयांना भाड्यानं घेतलं आहेत. सीझन्स ॲव्हेन्यूज प्रॉपर्टीज आणि आमिर खान यांच्यातील ‘लीव्ह अँड लायसन्स’ करारामध्ये 14व्या, 12व्या आणि 11व्या मजल्यावर असलेल्या तीन अपार्टमेंटचा समावेश आहे. त्यांचा कार्पेट एरिया अनुक्रमे 6,200 चौरस फूट, 3000 चौरस फूट आणि 3000 चौरस फूट आहे. या तिन्ही अपार्टमेंटचा एकूण कार्पेट एरिया 12,200 चौरस फूट आहे. हे अपार्टमेंट सांताक्रूझ (पश्चिम) येथील नॉर्थ ॲव्हेन्यूवर आहेत.
आमिर खानच्या घराचं भाडं
सर्वात मोठ्या अपार्टमेंटचं भाडं दरमहा 20 लाख रुपये आहे. उर्वरित दोन अपार्टमेंटचे भाडं दरमहा ९ लाख रुपये आहे. कराराचा कालावधी 48 महिन्यांचा आहे. हा करार 1 जानेवारी 2027 पासून 31 डिसेंबर 2030 पर्यंत वैध आहे. भाड्यात दरवर्षी 5% वाढ होईल. याव्यतिरिक्त, एका महिन्याच्या भाड्याएवढी ३८ लाख रुपये डिपॉझिट आहे. 2025 मध्ये आमिर खाननं मुंबईतील पाली हिलमध्ये चार अपार्टमेंट भाड्यानं घेतली आहेत. त्यांचं भाडे दरमहा २४.५ लाख रुपये आहे.
आमिर खानच्या प्रॉपर्टी बोलायचं झाल्यास, पाली हिलमध्ये त्याची प्रॉपर्टी आहे. त्यानं बेला व्हिस्टा अपार्टमेंट 9.75 कोटी मध्ये खरेदी केलं. वांद्रे येथेही त्याचं अपार्टमेंट आहे. पाचगणीमध्ये देखील त्याचं एक अपार्टमेंट आहे.
दरम्यान, आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास 5 जुलै 2026 मध्ये अभिनेत्यानं गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं. या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आमिरचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्याचं दुसरे लग्न किरण रावसोबत झालं होतं. दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत आणि त्यांचा घटस्फोट झाला. आमिर खानला पहिल्या लग्नापासून आयरा आणि जुनैद खान, आणि दुसऱ्या लग्नापासून आझाद, अशी तीन मुलं आहेत.
