AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

APEC Summit 2026 : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतिन यांची ऐतिहासिक बैठक संपली; अण्वस्त्रांबाबत मोठा निर्णय, कोण काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अण्वस्त्रांचा धोका कमी करण्यावर तिन्ही देशांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

APEC Summit 2026 : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतिन यांची ऐतिहासिक बैठक संपली; अण्वस्त्रांबाबत मोठा निर्णय, कोण काय म्हणाले?
Trump Putin Xi Jinping meeting APEC Summit 2026 (Photo Credit : XHNews)Image Credit source: XHNews
| Updated on: Nov 19, 2026 | 6:06 PM
Share

APEC Summit 2026 मध्ये अमेरिका, चीन आणि रशिया या तीन महासत्तांच्या प्रमुखांची ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक पार पडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात तासाभराहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीत अण्वस्त्रांचा धोका कमी करणे, अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे तसेच इराण आणि युक्रेनमधील युद्धाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तिन्ही देशांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका मांडली.

अणुयुद्धाबाबत तिन्ही देशांचे एकमत

अणुयुद्धात कोणाचाही विजय होऊ शकत नाही आणि असे युद्ध कधीही लढले जाऊ नये, यावर अमेरिका, चीन आणि रशियाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. अण्वस्त्रांशी संबंधित धोके कमी करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी तिन्ही देश एकमेकांशी चर्चा करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांसाठी एकत्र

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) स्थायी सदस्य असलेल्या तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. सध्याच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक सक्षम करण्याचा या सुधारणांचा उद्देश आहे. याशिवाय इंधन पुरवठा वाढवण्याबाबतही चर्चा झाली.

ट्रम्प म्हणाले, अण्वस्त्रे सोडण्यासाठी देशांना तयार करणे कठीण

दरम्यान, अण्वस्त्र सोडून देण्याची भूमिका मांडताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले. एखाद्या देशाला स्वतःची अण्वस्त्रे सोडण्यासाठी तयार करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एकदा अण्वस्त्रे तुमच्याकडे आली की ती नसणे खूप कठीण असते,’ असे ट्रम्प म्हणाले.

जिनपिंग यांचा एशिया-पॅसिफिक सहकार्यावर भर

एपीईसीच्या 33 व्या आर्थिक नेत्यांच्या बैठकीत बोलताना शी जिनपिंग यांनी एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला. या समुदायाच्या उभारणीसाठी सर्व देशांसोबत काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. दरम्यान, जिनपिंग यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दोघांची मैत्री चांगली असून, दोघेही सत्तेवर असेपर्यंत द्विपक्षीय संबंधांमध्ये अडचण येणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

Follow Us
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल