AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: सुनेत्रा पवार यांना त्या 5 आमदारांचा विरोध? राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा बॉम्ब गोळा, कोणते नेते टार्गेटवर?

Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel: सुनेत्रा पवार यांना त्या पाच आमदारांचा विरोध आहे का? त्यांना सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ वाटत नाही का? असा बॉम्बगोळा रोहित पवार यांनी टाकला. या नेत्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

Rohit Pawar: सुनेत्रा पवार यांना त्या 5 आमदारांचा विरोध? राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा बॉम्ब गोळा, कोणते नेते टार्गेटवर?
रोहित पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 19, 2026 | 10:53 AM
Share

Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel: सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करावी यासाठी 35 आमदारांनी आणि 32 प्रमुख पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला. त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. या पत्रावर 35 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पण 5 आमदारांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही असा दावा करत, त्यांना सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ वाटत नाही का? असा बॉम्बगोळा रोहित पवार यांनी टाकला. 5 ते 6 लोकांनी स्वाक्षरी केलेली नाही, असा आरोप करत रोहित पवार यांनी या नेत्यांकडे मोर्चा वळवला. त्यांनी या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला.

35 आमदारांचे केले अभिनंदन

रोहित पवार यांनी यापूर्वी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडावे यासाठी पाठिंबा देणाऱ्या 35 आमदारांचे अभिनंदन केले. ज्या 35 आमदारांनी सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष प्रस्तावित केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जवळपास 32, 33 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कागदावर लिहून दिले आहे की सुनेत्रा काकीच अध्यक्ष असाव्यात. घोषणा कोणीही केली असली तरी, तिथले आमदार आणि पदाधिकारी सुनेत्रा काकींच्या सोबत आहेत हे महत्त्वाचे आहे. त्यांना आमचा बाहेरून पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

त्या 5 आमदारांचा विरोध?

तर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे या पाठिंब्याच्या पत्रावर पाच आमदारांच्या स्वाक्षरी नाही. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ नये असे त्यांना वाटते का? स्वाक्षरी करणारे 35 आमदार दादांच्या विचारांचे आहेत. तर या पाठिंब्याच्या पत्रावर पाच ते सहा आमदारांनी स्वाक्षरी केलेली नाही. स्वाक्षरी न करणार्‍यांना सुनेत्रा पवार अध्यक्ष होऊ नये असं वाटतं का? रोहित पवार यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. स्वाक्षरी न केलेल्या पाच ते सहा जणांच्या मनात कदाचित काही वेगळं असावं. त्यातील एकाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं असेल असा टोलाही त्यांनी लगावला. ज्या 35 लोकांनी पाठिंबा प्रस्तावावर स्वाक्षरी केली. ते दादांच्या विचारांचे आहेत. जे दादांच्या विचारांचे आहेत, ते आमच्या विचारांचे आहेत. या पाच-सहा आमदारांनी आणि इतर काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा प्रस्तावावर का स्वाक्षरी केली नाही, असा सवाल करत ही लोकं कोण आहेत हे जनतेला माहिती आहेत असे मोठे वक्तव्य सुद्धा रोहित पवार यांनी केले आहे. त्यांचा रोख कुणाकडे आहे हे समोर आले.

अजितदादांवरील AI व्हिडिओचं प्रसारण थांबवा अन्यथा गुन्हा

तर अजितदादांवरील एआयद्वारे बनवलेले व्हिडिओ प्रसारीत करणं थांबवा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. दादांच्या आवाजात खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्य प्रसारित केली जात आहेत. हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असल्याचे ते म्हणाले. हा प्रकार लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असल्याचे तटकरे म्हणाले. त्यांनी याविषयीवर निवेदन जारी केले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...