AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar on Plane Crash: विमानाचा घातपात? अपघातामागे विम्याचं कारण? रोहित पवारांना ती मोठी शंका

Rohit Pawar on Plane Crash for Insurance: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजून एक मोठा दावा केला. अपघातामागे विम्याचं तर कारण नव्हतं ना? असा सवाल करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Rohit Pawar on Plane Crash: विमानाचा घातपात? अपघातामागे विम्याचं कारण? रोहित पवारांना ती मोठी शंका
रोहित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 12:25 PM
Share

Rohit Pawar on Plane Crash for Insurance: शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातप्रकरणी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. ही विमान दुर्घटना अपघात आहे की घातपात यावर त्यांनी पुराव्यासह बाजू मांडली. त्यात VSR कंपनीच्या एकूणच कारभारावर आणि तिला वाचवणारे स्टेकहोल्डरवर त्यांनी सडकून टीका केली. त्याचवेळी हे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत, याचे विश्लेषण त्यांनी आजच्या पत्रपरिषदेतून केली. त्यांनी आजही प्रेझेंन्टेशन दिले. विमान मुद्दामहून पाडलं असा खळबळजनक दावा त्यांचा आहे. विमा आणि विमानाच्या अखेरीस भरून ठेवलेले पेट्रोलच्या टँक यावरून त्यांनी हा घातपात असल्याचा अंगुली निर्देश केला. रोहित पवार हे तपास यंत्रणांच्या संथ कारभारावर ताशेरे ओढत आहेत. तर प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काय आहे त्यांचा दावा?

प्रकरणाचा घातपाताच्या दिशेने प्रवास

तपास यंत्रणां त्यांचं काम करतच आहेत. पण त्यांचे काम संथगतीने सुरू आहे. सीआयडी तपास करत आहे, तर तिचा अहवाल कुठे आहे, असा सवाल रोहित पवारांनी केला. त्यांनी तपास यंत्रणा या दबावाखाली तर काम करत नाहीत ना असा सवाल केला. सर्वसामान्यांनी हा घातपात आहे की अपघात यावर बोलण्यास सुरुवात केली. हा विषय लावून धरला. ते बोलत होते. आता राजकीय व्यक्तीही त्यावर बोलत आहेत. पत्र लिहित आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. आता हे प्रकरण अपघाताकडून घातपाताकडं चाललं आहे असे रोहित पवार म्हणाले.

नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मोठा दावा

काल परवा अजितदादांच्या विमान अपघाताचा एक नवीन व्हिडिओ समोर आला. त्यात विमान अपघातानंतर स्फोट झाल्याचे दिसते. यापूर्वीच रोहित पवार यांनी विमानात अधिक इंधनाचा साठा असल्याबाबात दावा केला होता. विमानाच्या मागील बाजूस अधिकचे फ्युअल पिंपात, प्लास्टिक टँकमध्ये ठेवण्यात आल्याची जी शंका होती ती बळावत असल्याचे रोहित पवार म्हणाले. तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याच्या वृत्ताबाबत त्यांनी या सर्व गोष्टींकडे घातापाताच्या बाजूने पाहता येईल असं वक्तव्य केलं.

अपघातामागे विम्याचं कारण?

या अपघातामागे विम्याचं कारण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. VSR च्या विमानाची किंमत ३५ कोटी आहे. पण त्याची क्वॉलिटी पाहिली तर ते फक्त १० ते १५ कोटीला विकल्या जाऊ शकलं असतं. १० कोटीच्यावर हे विमान गेलं नसतं असं काही लोकांनी सांगितलं. ५५ कोटी रुपयांचा विमा होता. लाएबिलीटी विमान होती २१० कोटी. त्यात पायलटही आले. पाचही जण आले. मेन पायलटला किती रुपये मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट पायलटला माहीत होती का याचं स्पष्टीकरण मिळायला हवं, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले.

अकाऊंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डीलिट केलं. त्याचा इंटरव्ह्यू डीजीसीने घेतला. ही माणसं कुठे आहे. त्यांची चौकशी केली का. डीजीसीएने काल जी नोटीस दिली त्यात सीसी अकाऊंटेबल मॅनेजर लिहिलं. पण तो कुठे आहे. जेट चालवत असाल तर लेगसीचं विमान चालवता येत नाही. पण पायलट कपूर हे दोन्ही विमान चालवत होता. नियमानुसार ते चुकीचं आहे. डीजीसीला सांगायचं की कागदं रंगवू नका. कागदाच फरक दिसला तर योग्य ठरणार नाही, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा