AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, शरद पवार पुन्हा खासदार होणार की नाही? काय आहे राजकीय गणित?

Rajya Sabha Election Announcement: राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 16 मार्चपर्यंत मतदान करता येणार आहे. यामध्ये राज्यातील 7 जागांसाठी मतदान होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार हे पुन्हा खासदार होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar: राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, शरद पवार पुन्हा खासदार होणार की नाही? काय आहे राजकीय गणित?
राज्यसभा निवडणूक, शरद पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 11:24 AM
Share

Rajya Sabha Election Announcement: राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. महायुतीच्या वाट्याला सहा जागा तर एक जागा महाविकास आघाडीच्या खात्यात येणार आहे. या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवण्यात येणार का, याची चर्चा रंगली आहे. राज्यसभेसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. तर 16 मार्चपर्यंत मतदान करता येणार आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे.

2 एप्रिल रोजी निवृत्ती

महाराष्ट्रातील 7,पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 5-5 जागांवर निवडणूक होईल. तामिळनाडूच्या 6 जागांवर निवडणूक होईल. राज्यातील फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व येत्या 2 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.

राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन देण्यात आले. 5 मार्चपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकतील. 6 मार्चपर्यंत अर्ज छाननी होईल. 9 मार्च रोजीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होईल. सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणी होईल. 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

राज्यसभा निवडणूक कार्यक्रम येथे वाचा  Biennial Elections to the Council of States to fill the seats of members retiring in April 2026

शरद पवार पुन्हा राज्यसभेवर?

दोन वर्षांपूर्वी राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपचे 131, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 57, अजित पवार पक्षाचे 40 असे महायुतीचे एकूण 228 आमदार निवडून आले आहेत. अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे सहा खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार निवडून जाईल. तर संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक जागा महाविकास आघाडी निवडून आणेल आणि त्यासाठी शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांनी संकेत दिले आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून अद्याप याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शरद पवार हे सध्या 85 वर्षांचे आहेत. त्यांनी यापूर्वी राज्यसभेच्या निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते. शरद पवार यांना राजकारणात 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांनी या काळात एकूण 14 निवडणूक लढल्या. त्यातील एकही ते हारले नाहीत.

शरद पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी राज्यसभेवर जावे अशी अनेकांची इच्छा आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या दिशा विरुद्ध असल्याचे दिसते. अजितदादांचा पक्ष सत्तेत आहे तर शरद पवारांचा पक्ष हा विरोधात आहेत. सध्याची समीकरणं पाहता शरद पवार हे भाजपसोबत जाण्याची शक्यता कमीच असल्याचे मानले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यसभेवर जावे अशी अनेकांची इच्छा आहे. येत्या दोन मार्चपर्यंत ते राज्यसभेसाठी इच्छुक आहेत की नाही हे समोर येईल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...