AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घाला, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, वाद पेटणार?

Sonia Gandhi Book: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र सध्या चर्चेत आहे. या पुस्तकात अनेक दावे, मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे. त्यानंतर भाजपने दोन दिवसांपूर्वी भर पत्रकार परिषदेत पुस्तकं फाडले. तर आता 'बिलॉन्गिंग ए जर्नी ऑफ लव' या पुस्तकावर राज्यात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घाला, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, वाद पेटणार?
सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घाला, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,
| Updated on: Nov 20, 2026 | 7:06 AM
Share

Sonia Gandhi Book ban demand : ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव’ या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची देशात मोठी चर्चा आहे. या पुस्तकातील काही दावे आणि मुद्दे यावर भाजपने हरकत घेत मुंबईत पुस्तक फाडले आणि वादाला तोंड फुटले. पुस्तक फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा दावा झाला आणि त्यावरून मोठा गदारोळ उठला. तर आता सोनिया गांधी यांच्या या आत्मचरित्रावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी समोर आली आहे. यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर बंदी घाला

सोनिया गांधींच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी भाजप नगरसेवक रूपेश सावरकर यांनी केली आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आल्याचा मुद्दा आता पेटला आहे. भाजपा नगरसेवक रूपेश सावरकर यांनी सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि बीएमसीकडे हे पुस्तक बॅन करण्याची मागणी करणार असल्याचे रूपेश सावरकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात राहिली आहे, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असेही रूपेश सावरकर यांनी ठणकावले आहे.

धीरेंद्र शास्त्रींची कथा

26/11 च्या शहिदांच्या नावाने पंडित धीरेंद्र शास्त्री यांची कथा होणार आहे. भाजप नगरसेवक रूपेश सावरकर यांनी माहिती दिली की, अंधेरीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या माध्यमातून 26/11 मधील शहीद कुटुंबीयांना आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच होत असलेल्या या कथेसाठी मुंबईच्या महापौरांनी अथक प्रयत्न केले आहेत. हा कार्यक्रम 26, 27 आणि 28 तारखेला होणार असून, यामध्ये पर्चीही उघडली जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक रूपेश सावरकर यांनी दिली.

शिंदे सेनेने पुस्तक फाडले

सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात पान क्रमांक 201 वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीवीर असा उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचा आरोप शिंदे शिवसेनेने केला. या पुस्तकातील ही आक्षेपार्ह पानं काढण्याची मागणी करत शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत हे पुस्तक फाडले. पुस्तक फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाटल्याचा आरोप करत ठाकरे सेनेने मोठे आंदोलन केले.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ