AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: राहुल गांधी भिवंडी कोर्टात, भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, प्रकरण तरी काय?

Rahul Gandhi Bhiwandi Court: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आज मुंबईत दाखल झाले. ते थोड्याच वेळात भिवंडी कोर्टात हजर होतील. आरएसएस स्वयंसेवकाने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. तर गांधींच्या ताफ्याला ठाण्यात भारतीय जनता युवा मोर्चाने काळे झेंडे दाखवल्याने वातावरण तापले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी भिवंडी कोर्टात, भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, प्रकरण तरी काय?
राहुल गांधी, भिवंडी कोर्टImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 10:26 AM
Share

BJP Workers Protest Against Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होईल. 2014 मध्ये राहुल गांधी यांनी आरएसएसशी सबंधित केलेल्या विधान प्रकरणी दाखल मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर होत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव भिवंडी कोर्ट परिसरात पोलीसांकडून कसून तपासणी करण्यात आली. तर काल एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजप संतप्त आहे. त्यातच राहुल गांधी हे आज ठाण्यात दाखल झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि घोषणा दिल्या.

काय आहे प्रकरण?

खासदार राहुल गांधी हे 2014 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. महात्मा गांधी यांची हत्या आणि आरएसएस यांच्या संबंधित ही टिप्पणी होती. त्याविरोधात संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते. पण चाकुरकर यांच्या निधनामुळे आता नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे. त्यासाठी राहुल गांधी हे कोर्टात हजर होत आहेत.

हर्षवर्धन सपकाळ नवीन जामीनदार

भिवंडी कोर्टात राहुल गांधींचे नवे जामीनदार काँग्रेसचे प्रदेश्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. दिवंगत शिवराज पाटील चाकुरकरानंतर हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार असतील. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात सुनावणीला हजर होतील. 2014 मधील मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात खटला सुरू आहे.

स्वागतासाठी विमानतळावर काँग्रेस सज्ज

दरम्यान आज सकाळी मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यात आमदार खासदारांचाही समावेश होता. आरएसएसशी संबंधित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर होणार आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी माहिती दिली आहे की गांधी यांना नव्याने जामीनदार सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राहुल गांधींच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

तर राहुल गांधी यांच्या ताफ्याला ठाण्यात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. काल दिल्लीत एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्याचा संताप आज ठाण्यात दिसून आला. राहुल गांधी यांना मुलुंड चेक नाका इथे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असूनही राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Follow Us
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान