AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! दोन दिवसात 10 कोटी दे, नाहीतर…बिश्नोई गँगची काँग्रेस आमदार साजिद खान यांना धमकी

Akola Congress MLA Threaten by Lawrence Bishnoi Gang: आतापर्यंत मुंबई, गुडगाव, दिल्ली आणि इतर प्रमुख शहरात धिंगाणा घालणाऱ्या बिश्नोई गँगची हिम्मत वाढली आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवर गोळीबार करण्यापर्यंत त्यांची मजल गेलीच आहे, आता ते राजकारण्यांच्या मागे लागल्याचे समोर आले आहे. अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान यांना टोळीने धमकी दिली आहे.

धक्कादायक! दोन दिवसात 10 कोटी दे, नाहीतर...बिश्नोई गँगची काँग्रेस आमदार साजिद खान यांना धमकी
अकोला आमदार साजिद खान पठाण, लॉरेन्स बिश्नोईImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 21, 2026 | 9:34 AM
Share

विनोद जगदाळे /प्रतिनिधी: अकोल्यातील भाजप शहर अध्यक्षांना धमकावल्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगने धमकी दिली आहे. शुभम लोणकर याने त्यांना गेम करण्याची, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून हा धमकीचा कॉल खान यांना आला. साजिद खान यांना 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे दिले नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देण्यात आली. आमदार साजिद खान यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिली. त्यांनी कॉले रेकॉर्डिंगही पोलिसांकडे दिले. तर त्याचवेळी त्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्जही सादर केला. बिश्नोई गँग आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजकांच्या मागे लागली होती. मुंबईतील घटनांवरून ते समोर आले. शुभम लोणकर हा वऱ्हाडातील आहे आणि त्याचे बिश्नोई गँगशी लागेबंध असल्याचे समोर आले आहे. आता गँग राजकारण्यांनाही धमक्या (Akola Congress MLA Threaten by Lawrence Bishnoi Gang) देत असल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा साजिद खान यांना थेट फोन

तर 16 फेब्रुवारी रोजी रात्री जवळपास 1:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साजिद खान यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले. सरकार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर साजिद खान यांना तातडीने Y श्रेणीतील सुरक्षा दिली.

आमदारांच्या सुरक्षेत वाढ

अकोला जिल्ह्यातील अजून एका आमदाराला पण धमकी मिळाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने चक्र फिरवली आहे. या प्रकरणाची चौकशी आणि तपास सुरू केला आहे. तांत्रिक पुरावे सुद्धा गोळा केले जात आहे. तर हा फोन कुणी केला. त्याविषयीचे तांत्रिक पुरावे आणि तपासाचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी 4 सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर दोन आमदारांना धमकीचे फोन आल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चंद्रक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यांनी सुरक्षा आणि तपासाची माहिती घेतली.

आमदार साजिद खान पठाण यांची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस तांत्रिक बाबींचा मागोवा घेत तपास करत आहे. धमकी नेमकी कुणी दिली आणि यामागे शुभम लोणकर आणि त्याच्या भावाचा काय हात आहे यादृष्टीनेही तपास सुरू आहे. राजस्थानसह इतर राज्यातील बिश्नोई गँगशी संबंधित तपास सुरू आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...