… तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट नावाच्या फसव्या कॉलपासून नागरिकांना सावध केले आहे. कायद्यात असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. अशा फ्रॉड कॉलला प्रतिसाद देऊ नका आणि तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधा, असे आवाहन फडणवीसांनी केले आहे. या माध्यमातून तात्काळ फसवणूक थांबवता येऊ शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना डिजिटल अरेस्ट नावाच्या फसव्या प्रकारापासून सावध राहण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, डिजिटल अरेस्ट असा कोणताही कायदेशीर प्रकार अस्तित्वात नाही. कायद्यानुसार, कोणालाही डिजिटली अटक करता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला डिजिटल अरेस्ट संबंधित कोणताही फोन किंवा व्हिडिओ कॉल आला, तर तो पूर्णपणे फ्रॉड कॉल आहे असे समजा.
या अशा फसव्या प्रकरणांमुळे मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींचीही फसवणूक झाली असल्याचे फडणवीसांनी नमूद केले. अनेक प्रकरणांमध्ये या फसवणुकीचे सूत्र विदेशातून हलवले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांनी तात्काळ 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. हा गोल्डन अवर असतो, ज्यामध्ये आपण त्वरित कारवाई करून फसवणुकीद्वारे हस्तांतरित होणारे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जाण्यापासून थांबवू शकतो. बँका आणि एनबीएफसीसारखे वित्तीय संस्था या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्याने ही तात्काळ मदत शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून अशा फसव्या कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Published on: Feb 24, 2026 01:44 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
