Aaditya Thackeray | राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभेच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, “2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिली होती.
संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभेच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, “2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिली होती. त्यामुळे यावेळी राज्यसभेची जागा आम्हाला मिळायला हवी.” त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर ठामपणे भाष्य करताना सांगितले की, राज्यसभेत पक्षाचे खासदार संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी सातत्याने प्रभावीपणे लढा देत आहेत. “हा लढा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात आहे, धारावी विकण्याच्या विरोधात आहे, तसेच मुंबई आणि महाराष्ट्र विकण्याच्या प्रयत्नांविरोधात आहे. हा लढा आम्ही ठामपणे देत आलो आहोत,” असेही ते म्हणाले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी दावा केला की, इंडिया आघाडीत गेल्या पाच वर्षांत ठामपणे राहिलेला आमचा पक्ष एकमेव आहे. त्यामुळे राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचा हक्क असल्याचा आग्रह त्यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या उमेदवारीवरून आघाडीत चर्चांना वेग आला असून, पुढील काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 24, 2026 04:52 PM
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा

