AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Budget 2026: झुकझुक नाही एकदम सैराट…देशातील या शहरात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, पापणी लवते न लवते तोच…

Railway Budget 2026: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रवासाची व्याख्याच बदलणार आहे. वंदे भारत रेल्वेला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आता या शहरांमध्ये हायस्पीड रेल्वे धावणार आहे.

Railway Budget 2026: झुकझुक नाही एकदम सैराट...देशातील या शहरात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, पापणी लवते न लवते तोच...
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 04, 2026 | 8:37 AM
Share

Railway Budget 2026: देशातील रेल्वे प्रवासाचे चित्र पाटलणार आहे. देशातील रेल्वेचा प्रवास सुरक्षित, गतिमान आणि आरामदायक होणार आहे. वंदे भारतने प्रवाशांची मनं जिंकली आहेत. आता देशातील सात ठिकाणी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जलदगतीने दोन शहरातील अंतर कापता येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयीची घोषणा केली. रेल्वेची ही गतिमानता विकासाचं चाकही फिरवणार आहे. नोकऱ्या, रोजगार आणि विकासाचा नवीन अध्याय लिहिला जाईल. देशातील या शहरात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर होतील.

बजेट 2026 मध्ये रेल्वेवर सरकारचा फोकस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. NDA सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले. सीतारमण यांनी मोदी सरकारचे 15 वे बजेट सादर केले. बजेट भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विकसीत भारतासाठी नवनवीन प्रयोगाची आनंदवार्ता दिली. लोकांचं उत्पन्न वाढवणे, ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत विकास पोहचवणे आणि निर्णायक धोरणं राबवण्यावर सरकारचा जोर असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी बजेटमध्ये खास तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

बजट 2026 मध्ये सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली. या कॉरिडॉरच्या माध्यमातून देशातील औद्योगिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्रांना, शहरांना एकमेकांशी जोडण्यात येईल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरु, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरु, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुड़ी या मार्गाचा यामध्ये समावेश आहे. या शहरांदरम्यान ही हायस्पीड रेल्वे वेगे वेगे धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. व्यापार आणि पर्यटनाला गती येईल.

ही रेल्वे 300 किमी पेक्षा अधिक ताशी वेगानं धावणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे डोळ्याची पापणी लवती न लवती तोच ही रेल्वे तुमच्या डोळ्यासमोरून भुर्रकन निघून जाईल. या हायस्पीड रेल्वेमुळे शहरातील अंतर कायम असलं तरी वेळेची मोठी बचत होईल. एका शहरातून दुसर्‍या शहरात सहज आणि वेगानं जाता येईल. दोन शहरात कनेक्टिविटी वाढवणं हा या रेल्वे प्रकल्पाचा मोठा उद्देश आहे. त्यातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्या त्या भागाचा मोठा विकास होईल. तर दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी ते सिलीगुडी या रेल्वेमुळे उत्तर भारत आणि पूर्वोत्तर राज्यातील दळणवळणाला गती येईल. व्यवसाय, वृद्धी होईल आणि विकास होईल.

2,55,445 कोटी रुपये वितरीत

आर्थिक वर्ष 2025-26 साठी रेल्वेला 2,55,445 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. ही रक्कम, हा निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकास, सुरक्षा आणि नवीन तांत्रिक विस्तारावर खर्च करण्यात येईल. सरकारचे लक्ष हे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करणे, आधुनिकता आणि विश्वसनीय करण्यावर भर आहे. या बजेटमध्ये सुरक्षा यंत्रणा कवच साठी सुद्धा मोठी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत 1,337 स्टेशनला आधुनिक रुपडे देण्यात येणार आहे. त्यांचा विकास आणि चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना