आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनता दरबारात धाव घेतली. शिक्षिका सी. पी. शिरसाट यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थी भावूक झाले. शिक्षिका शिरसाट यांच्याशी विद्यार्थ्यांचे चांगले नाते असल्याने त्यांना ही बदली मान्य नव्हती. त्यामुळे विद्यार्थिनीने थेट जनता दरबारात पोहोचून आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. शिक्षिकेची बदली थांबवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या मागणीची दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षिका सी. पी. शिरसाट यांच्या बदलीबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेसाठी घेतलेल्या भूमिकेची सध्या चर्चा सुरू आहे.
Published on: Aug 12, 2026 07:03 PM
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...