AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 : ग्राहकांना लागली ‘लॉटरी’; सरकारच्या या कृतीने सोने-चांदी झाली स्वस्त, काय आहे अपडेट

Gold Silver Rate Today : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये सर्वसामान्यांना काही सवलती मिळाल्या. बजेटमध्ये सरकारने सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात मोठी कपात केली आहे. त्याचा सराफा बाजारात लागलीच परिणाम दिसून येईल.

Budget 2024 : ग्राहकांना लागली 'लॉटरी'; सरकारच्या या कृतीने सोने-चांदी झाली स्वस्त, काय आहे अपडेट
सोने-चांदीत स्वस्ताई
| Updated on: Jul 23, 2024 | 2:02 PM
Share

मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केला. या बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यात सोने-चांदीच्या वाढत्या किंमतींबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. सीमा शुल्कात कपातीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, केंद्र सरकारने सीमा शुल्कात (Custom Duty) कपात केली. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. आज सकाळच्या किंमतीत आणि थोड्या वेळापूर्वीच्या किंमतीत त्यामुळे बदल दिसला. आता सराफा बाजारात या एका निर्णयाने मोठा फरक दिसून येणार आहे. ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे.

सीमा शुल्कात केली कपात

केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून कमी करण्यात आली. आता सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. कस्टम ड्युटीत अर्ध्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात आता पुन्हा चैतन्य दिसून येईल.

सोने-चांदीत मोठी घसरण

केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ केली होती. कस्टम ड्युटी 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आज केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी सीमा शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून 6 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसली. सोने जवळपास 2 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. बजेट संपताच लागलीच सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1988 रुपयांपर्यंत खाली आली. या घसरणीनंतर सोने 70730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले.

चांदीच्या किंमतीत बजेट संपल्यानंतर मोठी घसरण दिसली. चांदीच्या किंमतीत प्रति किलो 2429 रुपयांची घसरण दिसली. बजेट संपल्यानंतर चांदीची किंमत 86774 रुपये प्रति किलोवर आल्या. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होण्याची सराफा दुकानदारांची अपेक्षा आहे. जर सोने आणि चांदीची मागणी वाढली तरी किंमतीत बदल दिसू शकतो.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.